ई-पेपर
गुढी पाडव्याच्या निमित्ताने जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत व विश्र्व वंजारी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आठवे विश्व वंजारी साहित्य संमेलन २०२६ उत्साहात संपन्न…..
गुढी पाडव्याच्या निमित्ताने जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत व विश्र्व वंजारी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आठवे विश्व वंजारी साहित्य संमेलन २०२६ उत्साहात संपन्न.....

0
0
5
1
8
3
गुढी पाडव्याच्या निमित्ताने जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत व विश्र्व वंजारी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आठवे विश्व वंजारी साहित्य संमेलन २०२६ उत्साहात संपन्न…..
महाशक्ती न्युज चैनल (विशेष प्रतिनिधी डॉ अनिलजी सांगळे मुंबई)
शनिवार २१ मार्च २०२६
गुढी पाडवा व मराठी नववर्षाच्या पावन निमित्ताने आयोजित करण्यात आलेले “आठवे विश्व वंजारी साहित्य संमेलन” गुरुवार, दिनांक १९ मार्च २०२६ रोजी ऑनलाईन पद्धतीने अत्यंत उत्साहात व दिमाखात पार पडले. जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती (भारत) आणि विश्व वंजारी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ७:०० ते सायंकाळी ७:०० या कालावधीत हा भव्य साहित्यिक उपक्रम यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला. WhatsApp व Facebook समूहाच्या माध्यमातून पार पडलेल्या या संमेलनामध्ये देश-विदेशातील कवी, लेखक, साहित्यिक व साहित्यप्रेमी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. काव्यवाचन, साहित्यिक संवाद, विचारमंथन आणि विविध साहित्यिक सादरीकरणांनी संमेलनाची रंगत अधिकच वाढवली. सहभागी साहित्यिकांचा विशेष सन्मान करून त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला.
या संमेलनाला विश्व वंजारी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा सौ. सुरेखा शिरसाठ, सरचिटणीस श्री. रमेश केदार, उपाध्यक्ष व मुख्य संपादक श्री. भाऊसाहेब फड, महिला उपाध्यक्षा सौ. सुधामती मुंढे, मुख्य सल्लागार सौ. अलका नाईक तसेच स्वागताध्यक्ष श्री. प्रशांत आंधळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या संमेलनाच्या यशस्वी आयोजनामागे परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. डॉ. अनिल सांगळे यांचे विशेष योगदान राहिले.
या साहित्य संमेलनात सहभागी झालेल्या मान्यवर साहित्यिकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत डॉ कमलाकर संखे (विरार,पालघर)
मा. किरण मोरे (जि. रायगड)
मा. वैजयंतीमाला परशराम मदने (जि. पालघर)
मा. सौ. श्रद्धा सुहास शिंदगीकर (जि. पुणे) मा. सुदामती मुंडे (जि. बीड)
मा. राजेश साबळे (जि. पुणे)
मा. मीना घोडविंदे (जि. ठाणे)
मा विजयकुमार मेश्राम (जि. गोंदिया) मा. डॉ. संजय बर्वे (जि. नागपूर),
मुख्य संपादक व उपाध्यक्ष भाऊसाहेब फड (जि. अहिल्यानगर)
मा.सौ.अंजली राजेंद्र कस्तुरे (जि. छत्रपती संभाजीनगर)
मा. राजेंद्र लाड (जि. बीड)
मा. डॉ. श्रीहरी सानप (जि. यवतमाळ)
मा. उमाकांत काळे (जि. अकोला)
मा. उज्ज्वला लुकतुके
मा. हर्षा पाटील (जि. पालघर)
मा. मंगेश मनोहर रेडीज (जि. रत्नागिरी)
मा.श्री प्रमोद न. सूर्यवंशी (संपादक) मा. गोविंद कातकडे (जि. पालघर)
मा.डॉ. संगीता ग. घुगे (जि. नांदेड)
मा. सीमा माने (जि. पुणे)
मा. संध्या भांगरे (जि. नाशिक)
मा. सौ. सरोज सुरेश गाजरे (जि. ठाणे)
मा. सौ. मनिषा अजय कांबळे (जि. सांगली) मा. सौ. कोठेकर योगिता संजय (जि. पुणे)
मा.डॉ. शैलजा करोडे (जि. नवी मुंबई)
मा. डॉ. सौ. अनुपमा पाटील (जि. ठाणे) मा. श्री आबासाहेब शिंदे (जि. अहिल्यानगर)
मा.श्रीमती अनिताताई सोर (जि. अहिल्यानगर)
मा.प्रभाकर करपे (जि. मुंबई)
मा.अंकुश रामचंद्र जोष्टे (जि. ठाणे)
मा. डॉ. गणेश सुशिलाई तुकाराम पुंडे
मा. कविता बिरारी (जि. नाशिक)
मा.अशोक बी कांबळे (जि. नागपूर)
संमेलनाचे ब्रीदवाक्य “साहित्य सेवेतून समाजप्रबोधन” व “सर्वधर्मसमभाव, विश्वप्रेमी संघटन” याची प्रचिती या कार्यक्रमातून स्पष्टपणे दिसून आली. साहित्याच्या माध्यमातून समाजजागृती व एकात्मतेचा संदेश देणारे हे संमेलन सर्वांच्या मनात एक विशेष ठसा उमटवून गेले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल सर्व सहभागी साहित्यिक, पदाधिकारी व आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून भविष्यातही असे साहित्यिक उपक्रम अधिक व्यापक प्रमाणात आयोजित करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.अनिलजी सांगळे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे हा कार्यक्रम यशस्वी झाल्याबद्दल डॉ अनिलजी सांगळे साहेब यांनी महा शक्ती न्युज चैनलशी बोलताना मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर यांच्या समवेत उपस्थित सर्व कवी लेखक साहित्यिक विविध श्रेत्रातील मान्यवराचे आदरपूर्वक आभार मांडले आहे
0
0
5
1
8
3




