Breaking
ब्रेकिंग

श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचा श्री तिर्थक्षेत्र आळंदी येथे ७२८ वा संजीवन समाधी सोहळा……

श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचा श्री तिर्थक्षेत्र आळंदी येथे ७२८ वा संजीवन समाधी सोहळा......

0 0 5 1 8 3

श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचा श्री तिर्थक्षेत्र आळंदी येथे ७२८ वा संजीवन समाधी सोहळा……

 

आळंदी (महाशक्ती न्युज) पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचा ७२८ वा संजीवन समाधी सोहळा व एकादशी तसेच आळंदी यात्रा उत्सव चालु आहे.
श्री तिर्थक्षेत्र आळंदी येथे भजन, किर्तन, हरिपाठ,काकडा आरती, विविध ठिकाणी हरिनाम सप्ताह व भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संजीवन समाधी सोहळयासाठी संपूर्ण महाराष्ट्रातुन व जिल्ह्यातुन व गावागावातुन लहान मोठ्या पायी दिंडीचे आगमन झाले आहे.
श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या ७२८ संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आज श्रीतिर्थश्रेत्र आळंदी येथे व परिसरात १०ते १२ लाख वारकरी व भाविक भक्त उपस्थित आहेत. दशमी पासुन रात्र दिवस २४ तास दर्शन चालु आहे लाखों भाविक व वारकरी आळंदी येथे इंद्रायणी नदीमध्ये स्नान करून रांगेमध्ये काही मुख दर्शन व काही वारकरी मंदिरासमोर उभे राहुन कळसाचे दर्शन घेतात व मंदिराला प्रदक्षिणा मारतात.
देव आणि निवृत्ती यानी धरीले दोन्ही कर|
जातो ज्ञानेश्वर समाधीस||
जाऊनी ज्ञानेश्वर बैसले असनावरी|
पुढे ज्ञानेश्वरी ठेवीयेली||
भीम मुद्रा डोळा निरंजनी लीने|
झाले ब्रहापुर्ण ज्ञानदेव||
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे