ई-पेपर
लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब : जनतेच्या मनातील अजरामर नेतृत्व
लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब : जनतेच्या मनातील अजरामर नेतृत्व

0
0
5
9
2
0
लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब : जनतेच्या मनातील अजरामर नेतृत्व
महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
बुधवार ०३ जुन २०२६
महाराष्ट्राच्या नव्हे संपुर्ण भारताच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारे आणि ग्रामीण भागातील लोकांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारे लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे एक अष्टपैलू, दूरदृष्टीचे आणि जनतेशी नाळ जोडलेले नेतृत्व होते.
गरीब, शेतकरी, कष्टकरी, वंचित आणि उपेक्षित घटकांच्या न्यायहक्कासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरून त्यांनी जनतेच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडल्या. त्यांच्या ओजस्वी वक्तृत्वाने, निर्भीड भूमिकेने आणि लोकाभिमुख कार्यशैलीने त्यांनी लाखो कार्यकर्त्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.
राजकारणात प्रामाणिकपणा, संघर्षशीलता आणि जनसेवेची मूल्ये जपणारे मुंडे साहेब हे केवळ एका पक्षाचे नेते नव्हते, तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे खरे लोकनेते होते. ग्रामीण विकास, सामाजिक न्याय, शिक्षण आणि जनकल्याण यासाठी त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी आहे.
त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली. मात्र त्यांच्या विचारांचा, कार्याचा आणि जनसेवेच्या वारशाचा प्रकाश आजही असंख्य कार्यकर्त्यांना प्रेरणा देत आहे.
त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
“नेते अनेक होतात, परंतु जनतेच्या हृदयावर राज्य करणारे लोकनेते विरळच असतात. स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे त्यापैकीच एक होते.”
🌹भावपूर्ण अभिवादन! 🌹
•शब्दांकन•
समाजभूषण श्री लक्ष्मणभाऊ उगलमुगले
मु. खळी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर
मो. 9822777129
0
0
5
9
2
0




