ब्रेकिंग
श्रीश्रेत्र आश्वी खुर्द ते श्रीश्रेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळा प.पु.बाल ब्रम्हचारी पुंजाईमाता यांच्या शुभशिवादाने विविध कार्यक्रमासह श्री त्र्यंबकेश्वर येथे संपन्न……
श्रीश्रेत्र आश्वी खुर्द ते श्रीश्रेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळा प.पु.बाल ब्रम्हचारी पुंजाईमाता यांच्या शुभशिवादाने विविध कार्यक्रमासह श्री त्र्यंबकेश्वर येथे संपन्न......
0
0
5
1
8
3
श्रीश्रेत्र आश्वी खुर्द ते श्रीश्रेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळा प.पु.बाल ब्रम्हचारी पुंजाईमाता यांच्या शुभशिवादाने विविध कार्यक्रमासह श्री त्र्यंबकेश्वर येथे संपन्न……
महाशक्ती न्युज:- श्री श्रेत्र आश्वी खुर्द ते श्रीश्रेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळा शनिवार १८/०१/२०२५ ते रविवार २६/०१/२०२५ या कालखंडामध्ये दिंडी सोहळा संपन्न झाला.
प.पु.बाल ब्रम्हचारी पुंजाईमाता वै.उतरणकर महाराज,प.पु.भास्करगिरी महाराज, महंत स्वामी रामदासजी महाराज कर्नालकर, महंत दत्तगिरी महाराज, यांच्या कृपा आशिर्वादाने व हभप सुनिल महाराज पवार (आश्वीकर) यांच्या मार्गदर्शनाखाली व व्हि.डी.वपें साहेब,यांच्या संकल्पनेतून समस्त ग्रामस्थ यांच्या साथीने श्रीश्रेत्र आश्वी खुर्द ते श्रीश्रेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
दररोज सकाळी पहाटे ५ते७काकडा आरती सकाळी ८वाजता चहा व नाष्टा व दुपारचे जेवण व दुपारचा चहा व नाष्टा संध्याकाळी ५ ते ७ वाजता हरीपाठ ७ ते ९ विविध किर्तनकाराची प्रवचन व किर्तन सेवा संपन्न झाली व त्यानंतर महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
रविवार दिनांक २६/०१/२०२५ सकाळी ८ते १० हभप सुनिल महाराज पवार यांचे काल्याचे किर्तन झाले व त्यानंतर सावरगाव तळ मित्र परिवार यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
हभप सुनिल महाराज पवार व व्ही डी वपें साहेब अशोक येवले भिमराज गुंजाळ अशोक घोलप रमेश साबळे रमेश गिते सोन्याबापू मांढरे निवृती मांढरे पोपटराव पवार व ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्था आश्वी खुर्द सर्व विद्यार्थी सर्व वारकरी टाळकरी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन हा पालखी सोहळा यशस्वी केला आहे
0
0
5
1
8
3
