
0
0
5
1
8
3
कार्तिक स्नान समाप्ती निमित्ताने श्री तिर्थक्षेत्र ओझर बु येथे त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन…..
अहिल्यानगर (महाशक्ती न्युज) अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र ओझर बु येथे कोजागिरी पौर्णिमा पासून ते कार्तिक स्नान समाप्ती पर्यंत काकडा आरती चे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्ताने १२/११/२०२४ ते १५/११/२०२४ पर्यंत त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी ४ते ६ काकडा आरती भजन व सकाळी ७ते १२ ज्ञानेश्वरी पारायण संध्याकाळी ६ ते ७ हरिपाठ व ७ ते ९ जाहिर हरी किर्तन होईल त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
१२/११/२०२४ मंगळवार सायंकाळी ७ ते ९ हभप नवले महाराज याचे किर्तन होईल.श्री आहिलाजी खेमनर यांच्या वतीने एकादशी निमित्याने खिचडीचा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
१३/११/२०२४ बुधवार सायंकाळी ७ते९ हभप जगन महाराज उंबरकर यांचे जाहिर हरी किर्तन होईल व अनिल नागरे, मारूती नागरे व अर्जुन हळनर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
१४/११/२०२४ गुरुवार सायंकाळी ७ ते ९ हभप कान्होपात्राताई सुर्यवंशी यांचे जाहिर हरी किर्तन होईल व त्यानंतर श्री वामन खेमनर श्री जितेंद्र सानप श्री संजय नागरे यांच्या वतीने महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
१५/१४/२०२४ शुक्रवार सकाळी ८ते १० भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येईल व त्यानंतर प्रबोधनकार हभप प्रकाश महाराज आव्हाड यांचे काल्याचे जाहिर हरी किर्तन होईल व त्यानंतर समस्त ग्रामस्थ ओझर बु यांच्या वतीने महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
ओझर बु व पंचक्रोशीतील सर्वच भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ व महिला बचत गट व भजनी मंडळ ओझर बु यांनी केले आहे
0
0
5
1
8
3
