ई-पेपर
गुढी पाडवा व नववर्षा निमित्ताने आठवे विश्व वंजारी साहित्य संमेलन २०२६ आयोजन……
गुढी पाडवा व नववर्षा निमित्ताने आठवे विश्व वंजारी साहित्य संमेलन २०२६ आयोजन......

0
0
5
1
8
4
गुढी पाडवा व नववर्षा निमित्ताने आठवे विश्व वंजारी साहित्य संमेलन २०२६ आयोजन……
महाशक्ती न्युज
(डॉ.अनिलजी सांगळे मुंबई विभागीय विशेष प्रतिनिधी)
गुढी पाडवा व मराठी नववर्षाच्या या पावन निमित्ताने “आठवे विश्व वंजारी साहित्य संमेलन” ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आले असून हा साहित्यिक उपक्रम गुरुवार, दिनांक १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ७:०० ते सायंकाळी ७:०० वाजेपर्यंत पार पडणार आहे. जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती (भारत) आणि विश्व वंजारी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
WhatsApp व Facebook समूहाच्या माध्यमातून होणाऱ्या या संमेलनामध्ये देश-विदेशातील कवी, लेखक, साहित्यिक व साहित्यप्रेमी सहभागी होणार आहेत. संमेलनामध्ये काव्यवाचन, साहित्यिक संवाद, विचारमंथन तसेच विविध साहित्यिक सादरीकरणांचे आयोजन करण्यात आले असून सहभागी कवी, लेखक आणि साहित्यिकांचा विशेष सन्मानही करण्यात येणार आहे.
या संमेलनाला विश्व वंजारी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा सौ. सुरेखा शिरसाठ, सरचिटणीस श्री. रमेश केदार उपस्थित राहणार आहेत. तसेच परिषदेचे उपाध्यक्ष व मुख्य संपादक श्री. भाऊसाहेब फड, महिला उपाध्यक्षा सौ. सुधामती मुंढे, परिषदेच्या मुख्य सल्लागार सौ. अलका नाईक तसेच संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री. प्रशांत आंधळे यांचेही या साहित्य संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य लाभत आहे.
या संदर्भात विश्व वंजारी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. डॉ. अनिल सांगळे यांनी महा शक्ती न्युज चैनल पत्रकार परिषदेत माहिती देताना सर्व कवी, लेखक, साहित्यिक तसेच साहित्यप्रेमी नागरिकांना या ऑनलाईन साहित्य संमेलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
0
0
5
1
8
4




