Breaking
ई-पेपर

श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामानगर चे मठाधिपती गुरुवर्य स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा भव्य दिव्य स्वरूपात विविध सांधु संत व भाविक भक्तांच्या उपस्थित संपन्न…….

श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामानगर चे मठाधिपती गुरुवर्य स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा भव्य दिव्य स्वरूपात विविध सांधु संत व भाविक भक्तांच्या उपस्थित संपन्न.......

0 0 5 1 8 3

 

श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान भामानगर चे मठाधिपती गुरुवर्य स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांचा अभिष्टचिंतन सोहळा भव्य दिव्य स्वरूपात विविध सांधु संत व भाविक भक्तांच्या उपस्थित संपन्न…….

महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब) अहिल्या नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी तिरावरती श्रीतिर्थश्रेत्र भामाठाण येथील सुप्रसिध्द देवस्थान
ओम चैतन्य अडबंगनाथ महाराज व गुरुवर्य सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने, प्रभू रामचंद्र व लक्ष्मण यांच्या अश्रुने तयार झालेली शिळा व त्या शिळेवर अडबंगनाथांनी बारा वर्षे तपश्चर्या केलेली आहे अशा पवित्र पावन तपोभूमी मध्ये दि.४ नोव्हेंबर २०२५ वार मंगळवार रोजी दुपारी ४ वाजता गुरुवर्य स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांचा ४४ वा अभिष्टचिंतन सोहळा अगदी आनंदात साजरा करण्यात आला. गुरुवर्य स्वामी महाराजांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी हजारो भाविकांची उपस्थिती होती. सर्व भाविकांनी स्वामींजीना अभिष्टचिंतन सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या.
स्वामी महाराजांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजक श्री सर्जेराव कोते शिर्डी व भाऊ भोसले शिर्डी यांनी कार्यक्रमाचे भव्य दिव्य नियोजन केले होते. दुपारी ४ वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली. अनेक भाविकांनी स्वामी जींना शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. श्री निळकंठ तरकासे बाबूजी यांनी सुंदर अभिष्टचिंतनाचे गीत गायले. तद्नंतर गुरुपूजन सोहळा पार पडला.
स्वामी महाराजांनी सर्व भाविकांना आशीर्वाद दिले व सर्वांचे आभार मानले. त्यानंतर अनेक भाविक महिलांनी स्वामीजींचे औक्षण केलं. सर्व भाविकांनी स्वामीजींचे सत्कार रुपी गुरुपूजन केले. तदनंतर स्वामी अरुणनाथगिरी महाराजांनी आयोजक श्री सर्जेराव भाऊ होते शिर्डी व भाऊ भोसले पाटील शिर्डी यांचा सत्कार केला. स्वामी महाराजांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त भव्य दिव्य स्वरूपात अतिशबाजी करण्यात आली. मंदिर परिसरात रांगोळ्या काढण्यात आल्या. त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात आले. हजारो भाविकांनी अन्नदानाचा लाभ घेतला. स्वामी महाराजांचा अभिष्टचिंतन सोहळा अत्यंत चांगल्या प्रकारे भाविकांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमासाठी सर्व क्षेत्रातील भाविकांनी उपस्थिती नोंदवली. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर… आयोजक श्री सर्जेराव कोते पाटील शिर्डी, श्री भाऊ भोसले शिर्डी, नवनाथ आहेर शेठजी तळेगाव, वंदनाताई मुरकुटे, श्रीरामपूर पंचायत समिती चे बी.डि.ओ साहेब, पोलीस क्षेत्रातील PSI कणसे साहेब, शेंगाळे दादा व सर्व पोलीस क्षेत्रातील मान्यवर, श्री रायभान पवार साहेब निळवंडे, ह भ प सकाहारी महाराज जाधव, ह भ प रेवजिनाथ महाराज शिंदे, लेखक श्री निळकंठ तरकासे बाबूजी आदी मान्यवर उपस्थित होते            ‌तसेच महंत गुरूवर्य स्वामीजी अरूणनाथगिरी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत सर्व पदाधिकारी व महा शक्ती न्युज चैनल सर्व प्रत्रकार प्रतिनिधी व मा श्री भाऊसाहेब फड साहेब ओझरकर फाऊंडेशन यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व मनःपुर्वक शुभेच्छा.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे