ई-पेपर
सर्वत्र सर्पसुरक्षा आणि सर्पमित्रांचा अनमोल असे योगदान……
सर्वत्र सर्पसुरक्षा आणि सर्पमित्रांचा अनमोल असे योगदान......

0
0
5
1
8
3
सर्वत्र सर्पसुरक्षा आणि सर्पमित्रांचा अनमोल असे योगदान……
महाशक्ती न्युज (मुंबई विशेष प्रतिनिधी समाजसेवक डॉ. अनिलजी सांगळे)
माझ्या अनुभवातून आणि प्रत्यक्ष तसेच या अप्रत्यक्ष बघितले की तालुक्यामध्ये विषारी सापांचे प्रमाण काही भागांत जास्त आहे. प्रवरा नदीकाठच्या परिसरात तसेच डोंगरराण गाव, वाडे, वस्ती यामध्ये रसेल वायपर म्हणजेच घोणस, कोब्रा म्हणजेच नाग, मण्यार व फुरसे यांसारखे विषारी साप दिसतात. ओझर, हंगेवाडी, शेडगाव, उंबरी, आश्वी, प्रतापपूर, दाढ आणि गोदावरी नदीकाठचा नेवासा, जैनपूर या परिसरातही अशीच स्थिती आहे. डोंगरी विभागात या विषारी सापांचे प्रमाण तुलनेने कमी आहे, मात्र येथेही सावधगिरी आवश्यक आहे.माझ्या निरीक्षणानुसार, सर्व सर्पमित्रांनी एकत्र येऊन मोहीम राबवणे आवश्यक आहे, मात्र कोणत्याही सापाला एकट्याने हात लावू नका, विषारी असो वा बिनविषारी. सापांना मारू नये, त्यांना फक्त सुरक्षित पद्धतीने पकडून योग्य ठिकाणी सोडले पाहिजे. या मोहीमेच्या यशासाठी वनविभागाने सर्पमित्रांसाठी स्वतंत्र जमीन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, जिथे ते विषारी साप सुरक्षित ठेवू शकतील आणि त्यांच्या अन्न-पाण्याची व्यवस्था करू शकतील. विषारी सापांसाठी मासे, चिकन, अंडी यासारखे अन्न सर्पमित्रांनी किंवा शासनाने व्यवस्था करावी.
सर्पमित्रांचे काम अत्यंत धोकादायक असून, त्यांना स्वतःच्या वाहतुकीसाठी, अन्न-पाण्याच्या व्यवस्था व साप हाताळण्यासाठी आर्थिक खर्च करावा लागतो. म्हणून त्यांना मानवी कर्तव्य व सर्पसुरक्षेसाठी थोडे बक्षीस स्वरूपात आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. त्यांच्या संपर्क क्रमांक गावोगावी ग्रामपंचायतीत असणे गरजेचे आहे, जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित संपर्क साधता येईल.
भारतामध्ये रसेल वायपर (घोणस) अत्यंत प्रचंड विषारी असून, त्याच्या चाव्यामुळे मृत्यू होऊ शकतो. यासोबत कोब्रा (नाग), मन्यार, फुरसे, तसेच काही स्थानिक विषारी साप आहेत. बिनविषारी सापांमध्ये धामण, गांडूळ, टेराकोटा, अन्य स्थानिक साप समाविष्ट आहेत, जे शेतातील उंदीर खाऊ शकतात आणि नैसर्गिक संतुलन राखतात.
शेतकऱ्यांना महत्त्वाचे सूचित करावे की बिनविषारी साप जरी चावले तरी उपचार घेणे आवश्यक आहे. बिनविषारी साप विविध उंदीर किंवा कीटक खातात, त्यामुळे त्यांच्या दातामध्ये काही कण किंवा जीवाणू शरीरात प्रवेश करू शकतात. यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते, म्हणून डॉक्टरकडे जाऊन अँटिबायोटिक घेणे गरजेचे आहे. तसेच डॉक्टरकडे वेळेवर जाऊन अन्य कोणतेही आजार उद्भवणार नाही याची काळजी स्वतः घ्यावी.
सर्पमित्रांनी विषारी व बिनविषारी साप हाताळताना सुरक्षितता, अनुभव आणि योग्य प्रक्रिया पाळणे आवश्यक आहे. सापांना बेशुद्ध करण्याची गरज नाही; सावधगिरी बाळगून त्यांना सुरक्षित पद्धतीने हाताळणे हा योग्य मार्ग आहे. सर्पमित्रांसाठी स्वतंत्र जमीन, अन्न-पाणी, वाहतुकीची सोय तसेच सरकारकडून लसी व औषधांची उपलब्धता या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत.सर्व तालुक्यातील सरकारी हॉस्पिटलमध्ये विषारी सापांच्या लसी, प्रतिबंधक उपाय आणि जीवन रक्षक औषधे उपलब्ध आहेत. रसेल वायपरसारख्या हिमोटॉक्सिन विषासाठी वेगळी लस देण्यात येते, तर कोब्रा, मण्यार यांसारख्या न्युरोटॉक्सिन विषासाठी वेगळी लस देण्यात येते. हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन, रक्तस्राव थांबवणारी औषधे व आपत्कालीन उपचाराची सोय उपलब्ध आहे. शेतकरी व ग्रामीण लोकांनी या हॉस्पिटल्सची माहिती ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
माझ्या मते, साप हाताळताना सावधगिरी, अनुभव, प्रशासनाचा योग्य समन्वय आणि सरकारी आरोग्य केंद्रातील लसी, औषधे व उपचाराची तत्परता यामुळे तालुक्यातील नागरिक सुरक्षित राहू शकतात. विषारी सापांच्या चाव्यामुळे जीवन-आर्थिक दोन्ही नुकसान टाळता येते. सर्पमित्र हे आपल्या जीवासह सापांचा जीव वाचवतात आणि शेतकरी सुरक्षित राहतात. म्हणून त्यांना आर्थिक मदत आणि समाजमान्यता देणे गरजेचे आहे.
विषारी सापांची यादी:
रसेल वायपर (घोणस) — हिमोटॉक्सिन
कोब्रा (नाग) — न्युरोटॉक्सिन
मण्यार — न्युरोटॉक्सिन
फुरसे — न्युरोटॉक्सिन
बिनविषारी सापांची यादी:
धामण — कीटकभक्षी/उंदीर
गांडूळ — कीटकभक्षी
टेराकोटा — उंदीर
इतर स्थानिक बिनविषारी साप
सर्पमित्रांनी साप हाताळताना आणि शेतकरी सुरक्षित ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न, सरकारी हॉस्पिटलमधील लस व औषधांची तत्परता, योग्य प्रशासन आणि जनजागृती या सर्व बाबी तालुक्यातील नागरिकांना सुरक्षित ठेवतात. या प्रयत्नांनी ग्रामीण भागातील जीवनावश्यक कार्य व शेती सुरक्षित राहते, तसेच विषारी सापांपासून होणारे मृत्यू आणि आर्थिक नुकसान कमी होते.
एखाद्यास विषारी जरी साप चावला आणि तुमची भाऊबंदकी असल्यास तो विषय बाजूला ठेवून त्या व्यक्तीचा जीव वाचवणे गरजेचे आहे कुणावर काय प्रसंग येईल सांगता येत नाही कोणावर काय वेळ येईल हे सांगता येत नाही त्यामुळे आपल्या कौटुंबिक दुश्मनी भाऊबंदकी भांडण तंटा या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एकमेकांचा जीव वाचवावा ही नम्र विनंती आणि प्रार्थना..
मा.डॉ.अनिल सांगळे असे आवाहन महा शक्ती न्युज चैनल शी मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब यांच्या कडे केले आहे
0
0
5
1
8
3




