ई-पेपर
लेने को हरिनाम| देणे को अन्नदान|| योगिराज सद गुरु गंगागिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताह श्रीक्षेत्र कनोली येथे संपन्न…..
लेने को हरिनाम| देणे को अन्नदान|| योगिराज सद गुरु गंगागिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताह श्रीक्षेत्र कनोली येथे संपन्न.....
0
0
6
4
2
4
लेने को हरिनाम|
देणे को अन्नदान||
योगिराज सद गुरु गंगागिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताह श्रीक्षेत्र कनोली येथे संपन्न…..
महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
बुधवार ९ सप्तेंबर २०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले श्रीक्षेत्र कनोली येथे मंगळवार दिनांक १ सप्तेंबर ते मंगळवार ८ सप्तेंबर २०२६ या कालावधीमध्ये लेने को हरिनाम|
देनेको अन्नदान||
योगीराज सद गुरु गंगागिरी महाराज अखंड हरीनाम सप्ताह श्रीक्षेत्र कनोली ता संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झाला.
विशेष म्हणजे सलग २४ तास अखंड हरीनाम भजन झाले व सकाळी ८ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला.
सायंकाळी ७ते९ या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकाराची किर्तन सेवा संपन्न झाली.त्यानंतर सलग ६ दिवस आमटी भाकरी चा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते एकादशी निमित्ताने खिचडी व झिरकेचा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
आठव्या दिवशी सकाळी ९ते ११ भव्यदिव्य स्वरूपात मिरवणुक काढण्यात आली होती त्यानंतर महंत मधुसूदन गिरी महाराज यांचे काल्याचे जाहिर हरी किर्तन सेवा संपन्न झाली व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
या सर्व कार्यक्रमा साठी कनोली येथील सर्व ग्रामस्थ व महिला व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त ग्रामस्थ व सर्व युवक व महिला व सर्व भजनी मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले होते.
0
0
6
4
2
4




