Breaking
ई-पेपर

श्रावण मास व गोकुळ अष्टमी निमित्ताने अखंड हरीनाम सप्ताह श्रीक्षेत्र शेडगाव येथे भव्य दिव्य स्वरूपात संपन्न…..

श्रावण मास व गोकुळ अष्टमी निमित्ताने अखंड हरीनाम सप्ताह श्रीक्षेत्र शेडगाव येथे भव्य दिव्य स्वरूपात संपन्न.....

0 0 6 4 2 4

श्रावण मास व गोकुळ अष्टमी निमित्ताने अखंड हरीनाम सप्ताह श्रीक्षेत्र शेडगाव येथे भव्य दिव्य स्वरूपात संपन्न…..

महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
बुधवार ९ सप्तेंबर २०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले श्रीक्षेत्र शेडगाव येथे श्रीगणेश, श्री विठ्ठल रुक्मिणी माता, बजरंग बली, श्री महादेव श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली, श्रीसंत तुकाराम महाराज,मुक्ताई माता, लक्ष्मी माता बिरोबा महाराज,श्रीसंत भगवानबाबा,श्रीसंत माणिक गिरी महाराज या सर्वांच्या कृपा आशिर्वादाने व महंत गुरुवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली
श्रीश्रेत्र शेडगाव येथे मंगळवार दिनांक १ सप्तेंबर ते मंगळवार ८ सप्तेंबर २०२६ या कालावधीमध्ये
अखंड हरीनाम सप्ताह श्रीक्षेत्र शेडगाव ता संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झाला.
विशेष म्हणजे सलग २४ तास अखंड वीणा व पहाटे ४ते ६ काकडा आरती व सकाळी ८ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न झाला.
सायंकाळी ६ते ७ या कालावधीमध्ये आश्र्वी येथील ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्था आश्र्वी खुर्द येथील सर्व मुले व मुली यांच्या उपस्थित मध्ये भव्य दिव्य स्वरूपात दररोज हरिपाठ संपन्न झाला त्यानंतर
सायंकाळी ७ते९ या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकाराची किर्तन सेवा संपन्न झाली.त्यानंतर सलग ६ दिवस आमटी भाकरी चा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते एकादशी निमित्ताने सायंकाळी ७ते ९ महंत गुरुवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांचे जाहीर हरी किर्तन सेवा झाली व त्यानंतर खिचडी व झिरकेचा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
आठव्या दिवशी सकाळी ९ते ११ भव्यदिव्य स्वरूपात मिरवणुक काढण्यात आली होती त्यानंतर महंत सुदर्शन महाराज शास्त्री यांचे काल्याचे जाहिर हरी किर्तन सेवा संपन्न झाली व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
या सर्व कार्यक्रमा साठी शेडगाव येथील सर्व ग्रामस्थ व महिला व पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त ग्रामस्थ व सर्व युवक व महिला व सर्व भजनी मंडळ व ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थाचे हभप सुनिल महाराज पवार व त्यांचे सर्व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 4 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे