ई-पेपर
अदिशक्ती जगदंबा माता श्रीक्षेत्र ओझर बु येथे नवरात्र निमित्ताने देवीची भव्यदिव्य मिरवणुसह स्थापना …..
अदिशक्ती जगदंबा माता श्रीक्षेत्र ओझर बु येथे नवरात्र निमित्ताने देवीची भव्यदिव्य मिरवणुसह स्थापना .....

0
0
6
6
9
9
अदिशक्ती जगदंबा माता श्रीक्षेत्र ओझर बु येथे नवरात्र निमित्ताने देवीची भव्यदिव्य मिरवणुसह स्थापना …..
महाशक्ती न्युज मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर
सोमवार दिनांक १२ऑक्टोबर २०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले श्रीक्षेत्र ओझर बु येथे आदिशक्ती जगदंबा माता सुप्रसिद्ध देवस्थान आहे येथे संपुर्ण नवरात्रामध्ये रात्र दिवस मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी असते
काल रविवारी सकाळी १० वाजता मोहटादेवी येथुन आलेल्या ज्योत व देवीच्या मुर्तीसह संपुर्ण ओझर बु संपुर्ण गावात मिरवणुक सह आगमन झाले व आदिशक्ती जगदंबा माता मंदिराजवळ विधिवत पूजा आरती करून स्थापना करण्यात आली.यावेळी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
तसेच दुपारी २ वाजता कोल्हार येथुन आलेल्या ज्योत व मुर्तीचे ओझर बु येथे भव्य दिव्य स्वरूपात मिरवणुक सह आगमन झाले व याही देवीचे ओझर बु येथे मारूती मंदिराजवळ विधीवत पूजा आरती करून स्थापना करण्यात आली यावेळी मोठया प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते संपुर्ण ओझर बु व पंचक्रोशी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे
अदिशक्ती जगदंबा मातेचे दर्शन घेण्यासाठी पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते.
तसेच नवरात्रामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहुन आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच नवरात्र निमित्ताने सर्व भाविक भक्तांना महाशक्ती न्युज चैनल व दैनिक महाशक्ती व सर्व प्रत्रकार प्रतिनिधी यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा
0
0
6
6
9
9

