Breaking
ई-पेपर

राष्ट्रीय फार्मासिस्ट सुरक्षा संघटन च्या महासचिव पदी महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरचे श्री.तुकाराम सांगळे साहेब यांची नियुक्ती……

राष्ट्रीय फार्मासिस्ट सुरक्षा संघटन च्या महासचिव पदी महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरचे श्री.तुकाराम सांगळे साहेब यांची नियुक्ती......

0 0 6 4 2 4

राष्ट्रीय फार्मासिस्ट सुरक्षा संघटन च्या महासचिव पदी महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरचे श्री.तुकाराम सांगळे साहेब यांची नियुक्ती……

महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
गुरुवार दिनांक २० ऑगस्ट २०२६
राष्ट्रीय फार्मासिस्ट सुरक्षा संघटन ( RPSS, ) ही भारतातील सर्व क्षेत्रातील औषध निर्माता यांचे हक्कांचे संरक्षण करणारी एकमेव संघटना आहे. सदर संघटनेच्या महासचिव पदी राज्य औषध निर्माण अधिकारी संघटनेचे सल्लागार महाराष्ट्र राज्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्री तुकाराम सांगळे साहेब ( सेवानिवृत्त मुख्य औषध निर्माण अधिकारी,) यांची
ऑल इंडिया मतदान प्रक्रिये द्वारे निवड करण्यात आली आहे.
त्यांनी ह्या पूर्वी औषध निर्माण अधिकारी संघटनेचे अध्यक्ष म्हणून दहा वर्ष काम केलेले आहेत. तसेच औषध निर्माण अधिकारी संघटना , महाराष्ट्र संघटनेचे आठ वर्षे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. सध्या ते औषध निर्माण अधिकारी राज्य संघटनेचे तज्ञ सल्लागार म्हणून काम करीत आहेत.त्यांची वरील कामाचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय फार्मासिस्ट सुरक्षा संघटन ह्या संघटनेच्या महासचिव पदावर मतदानप्रक्रिये द्वारे निवड करण्यात आली आहे.
ह्या निवडीबद्दल त्यांचे औषध निर्माण अधिकारी संघटना ,अहिल्यानगर व औषध निर्माण अधिकारी राज्य संघटना तसेच राज्य ग्रामसेवक संघटनेचे माजी राज्य अध्यक्ष ,शिक्षण सम्राट एकनाथराव ढाकणे यांचेकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
तुकाराम सांगळे हे गेल्या ८ वर्षांपासून सामाजिक कार्य करीत असून ते राष्ट्रीय जयंती उत्सव समिती सलग्न वंजारी समाज सेवा, प्रतिष्ठान चे सचिव पदी कार्यरत आहेत. त्यामुळं ह्या समितीच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन केले असून त्यांना सर्व समाज बांधवांनी भावी कार्यास शुभेच्या दिल्या आहेत.
तसेच श्री तुकाराम सांगळे यांच्या निवडीबद्दल समाजसेवक कार्यसम्राट व मुख्य संपादक व संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब फड साहेब ओझरकर व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत सर्व पदाधिकारी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व मनःपुर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 6 4 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे