Breaking
ई-पेपर

श्रीक्षेत्र भामाठाण अडबंगनाथ तपोभूमी येथे संगित रामायण कथा,श्री नवनाथ पारायण व किर्तन महोत्सव व भव्यदिव्य धर्मनाथ बीज सोहळ्यासह विविध कार्यक्रमांना भाविक भक्तांची अफाट गर्दी …..

श्रीक्षेत्र भामाठाण अडबंगनाथ तपोभूमी येथे संगित रामायण कथा,श्री नवनाथ पारायण व किर्तन महोत्सव व भव्यदिव्य धर्मनाथ बीज सोहळ्यासह विविध कार्यक्रमांना भाविक भक्तांची अफाट गर्दी .....

0 0 5 1 8 3

श्रीक्षेत्र भामाठाण अडबंगनाथ तपोभूमी येथे संगित रामायण कथा,श्री नवनाथ पारायण व किर्तन महोत्सव व भव्यदिव्य धर्मनाथ बीज सोहळ्यासह विविध कार्यक्रमांना भाविक भक्तांची अफाट गर्दी …..

महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) शुक्रवार दिनांक १६/०१/२०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र भामाठाण येथील सुप्रसिध्द देवस्थान ॐचैतन्य अडबंगनाथ तपोभूमी व सद्गुरू नारायण गिरी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने व महंत गुरूवर्य स्वामीजी अरूणगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र भामाठाण येथे मंगळवार दिनांक १३/०१/२०२६ ते बुधवार दिनांक २१/०१/२०२६ प्रर्यत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दिवसभर व रात्रीपण महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
भव्यदिव्य स्वरूपात धर्मनाथ बीज सोहळा व रामायणाचार्य हभप रामरावजी ढोक महाराज यांच्या वाणीतुन संगित रामायण कथा २ते ५ यावेळेत होत आहे व नवनाथ पारायण सकाळी ७ते११ यावेळेत होत आहे . पहाटे ४ते ६ यावेळेत काकडा आरती होत आहे.व सायंकाळी ५ते ६ यावेळेत हरिपाठ व तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार यांचे प्रवचन, किर्तन सेवा संपन्न होत आहे.
मंगळवार दिनांक २०/०१/२०२६ रोजी धर्मनाथ बीज सोहळ्यानिमित्ताने सायंकाळी ७ते९ महंत गुरूवर्य अरूणगिरी महाराज यांची किर्तन सेवा संपन्न होईल.
व बुधवार दिनांक २१/०१/२६ सकाळी १०ते १ यावेळेत महंत गुरूवर्य स्वामीजी अरूणगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन सेवा संपन्न होईल त्यानंतर श्री अविनाशजी भामरे साहेब (आयटी उद्योजक पुणे) यांच्या वतीने काला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या सर्व कार्यक्रमाचा श्रीक्षेत्र भामाठाण व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त व महिलांनी उपस्थित राहुन या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महंत गुरूवर्य स्वामीजी अरूणगिरी महाराज यांनी केले आहे.
तसेच गुरुवार १५/०१/२०२६ रोजी लोकनेते मा.श्री. बाळासाहेब थोरात साहेब व मा.श्री.हेमंत ओगासे (आमदार श्रीरामपूर) महंत गुरूवर्य स्वामीजी अरूणगिरी महाराज व रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज व भाविक भक्त उपस्थित होते.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे