ई-पेपर
बाल ब्रह्मचारी शिवभक्त प.पु.साध्वी पुंजाबाई यांचा पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने श्रीक्षेत्र पुनतगाव व पाचेगाव येथे तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन….
बाल ब्रह्मचारी शिवभक्त प.पु.साध्वी पुंजाबाई यांचा पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने श्रीक्षेत्र पुनतगाव व पाचेगाव येथे तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन....

0
0
5
1
8
3
बाल ब्रह्मचारी शिवभक्त प.पु.साध्वी पुंजाबाई यांचा पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने श्रीक्षेत्र पुनतगाव व पाचेगाव येथे तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन….
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) शनिवार दिनांक १७/०१/२०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील श्रीश्रेत्र पुनतगाव व पाचेगाव येथील पंडुरे वस्तीवरती बाल ब्रह्मचारी शिवभक्त साध्वी प.पु.पुजाबाई माता यांचा याही वर्षी तीन दिवसीय पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे.शुकवारी १६/०१/२०२६ रोजी सकाळी ११ वाजता कावडीने आणलेल्या गंगेच्या पाण्याने साध्वी पुजांबाई मातेचा अभिषेक करण्यात आला आहे.
सायंकाळी ७ते९ हभप श्रीहरी महाराज वाकचौरे यांचे जाहीर हरी किर्तन सेवा झाली व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवार दिनांक १७/०१/२०२६ रोजी सकाळी बाल ब्रह्मचारी शिवभक्त साध्वी पुजांबाई माता ग्रंथाचे पारायण करण्यात येणार आहे
दुपारी ४ते६ ग्रंथासह प्रतिमेची भव्य दिव्य स्वरूपात मिरवणुक काढण्यात येणार आहे
व त्यानंतर ७ते९ हभप बाळु महाराज पंडुरे यांचे जाहीर हरी किर्तन सेवा संपन्न होईल व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दिनांक १८/०१/२०२६ रोजी सकाळी १०ते१२ वेळेत हभप चंद्रकांत सांगळे महाराज यांचे काल्याचे जाहिर हरी किर्तन सेवा संपन्न होईल व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी पुनतगाव व पाचेगाव येथील व पंचक्रोशीतील सर्वच भाविक भक्त महिला व सर्वच श्रेत्रातील विविध मान्यवर व साधुसंत यांनी उपस्थित राहुन विविध कार्यक्रम व महाप्रसाद व दर्शन सोहळ्याचा आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन हभप बाळु महाराज पंडुरे महाराज यांनी महा शक्ती न्युज चैनलशी बोलताना केले आहे.
0
0
5
1
8
3




