Breaking
ई-पेपर

अदिशक्ती जगदंबा माता बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व विश्र्व वंजारी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सातवे “विश्व वंजारी साहित्य संमेलन”२०२५ व तृतीय वर्धापन दिन भव्य दिव्य उत्साहात साजरा व सहभागी सर्व साहित्यिकांचा समाज भुषण पुरस्कार २०२५ देऊन झाला सन्मान …..

अदिशक्ती जगदंबा माता बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व विश्र्व वंजारी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सातवे “विश्व वंजारी साहित्य संमेलन”२०२५ व तृतीय वर्धापन दिन भव्य दिव्य उत्साहात साजरा व सहभागी सर्व साहित्यिकांचा समाज भुषण पुरस्कार २०२५ देऊन झाला सन्मान .....

0 0 5 1 8 3

अदिशक्ती जगदंबा माता बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व विश्र्व वंजारी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने
सातवे “विश्व वंजारी साहित्य संमेलन”२०२५ व तृतीय वर्धापन दिन भव्य दिव्य उत्साहात साजरा व सहभागी सर्व साहित्यिकांचा समाज भुषण पुरस्कार २०२५ देऊन झाला सन्मान …..

महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
मंगळवार दिनांक २९/१२/२०२५
विश्व वंजारी साहित्य परिषद व आदिशक्ती जगदंबा माता बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य रजि.नं.५७२/२०१९ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी सातवे “विश्व वंजारी साहित्य संमेलन” तसेच संस्थेचा तृतीय वर्धापन दिन ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला होता.
या साहित्य संमेलनात साहित्यिक, लेखक, कवी, वाचक व रसिक वर्गासाठी हा एक महत्त्वाचा साहित्यिक उत्सव ठरला आहे. कार्यक्रम गुरूवारी सकाळी ७.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत ऑनलाईन काव्यलेखन व व्हिडिओद्वारे साहित्य वाचन या माध्यमातून पार पडले.
गुरुवारी सकाळी ९ वाजता या वेळेत नागपुर येथील सुप्रसिध्द ज्येष्ठ साहित्यिक श्री अशोकजी कांबळे साहेब यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्यानंतर आपले अनमोल विचार व्यक्त केले व त्यानंतर मुंबई येथुन सन्माननीय सुप्रसिध्द साहित्यिक शारदाताई खेडकर अध्यक्षस्थानी विराजमान झाले.व आपले अनमोल विचार मांडले.
तसेच बीड येथुन साहित्यिक व कवीयत्री श्रीमती सुदामती ताई मुंडे या प्रमुख अतिथी उपस्थित राहीले व त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
तसेच या संमेलनामागील प्रमुख उद्दिष्टे म्हणजे साहित्य सेवेतून समाजप्रबोधन, मराठी भाषेचे सक्षमीकरण, तसेच सर्वधर्मसमभाव व विश्वप्रेमी संघटन घडविणे होय. कार्यक्रमात मराठी भाषा, इतिहास, निसर्ग, वर्तमान व भविष्यकालीन विचार, साहित्य, क्रीडा, कला आणि सामान्य ज्ञान या विषयांवरती आधारित साहित्यिकांनी आपले सादरीकरण केले.
सातवे विश्र्व वंजारी साहित्य संमेलन २०२५ व तृतीय वर्धापनदिन सोहळ्या मध्ये संपुर्ण महाराष्ट्रातुन मोठ्या प्रमाणात खालील साहित्यिक लेखक कवी सहभागी झाले होते.
१) मा. अशोक बी. कांबळे (उद्घाटक) (जि. नागपूर)
२) मा. शारदाताई खेडेकर (अध्यक्षा) (जि. मुंबई)
३) मा. विजयकुमार मेश्राम (जि. गोंदिया)
४) मा. किरण मोरे (महाड, जि. रायगड)
५) मा. सौ. रिचा राजेश गांधी (महाड, जि. रायगड)
६) मा. संध्या भांगरे सम्राज्ञी (जि. नाशिक)
७) मा. मंगेश मनोहर रेडीज (घाटीवळे, जि. रत्नागिरी)
८) मा. नागनाथ पाटलोबा बडे (जि. बीड)
९) मा. डॉ. शितलताई मालुसरे (महाड, जि. रायगड)
१०) मा. कविता बिरारी (जि. नाशिक)
११) मा. डॉ. संगीता घुगे (जि. नांदेड)
१२) मा. सौ. मीना घोडविंदे (जि. ठाणे)
१३) मा. सुधामती दादाहरी मुंडे (जि. बीड)
१४) मा. कवी भाऊसाहेब गीते — नाशिक, महाराष्ट्र
१५) मा. गोविंद कातकडे (जि. पालघर)
१६) मा. ॲड. भूमी मोरे (वकील) (विरार, जि. पालघर)
१७) मा. सुरेखा गायकवाड (दिवा, जि. ठाणे)
१८) मा. दिगंबर माणिकराव गावस्कर
१९) मा. सौ. सरोज सुरेश गाजरे (भाईंदर)
२०) मा. अशोक गुट्टे (सालेगावकर) (जि. हिंगोली)
२१) मा. प्रभाकर करपे (समीक्षक) (वर्सोवा, जि. मुंबई)
२२) मा. अंकुश रामचंद्र जोष्टे (जि. ठाणे)
२३) मा. डॉ. अनुपमा नरेश पाटील (जि. ठाणे)
२४) मा. सारिका राजेंद्र सोनजे (जि. नाशिक)
२५) मा. वैजयंतीमाला परशराम मदने — झेंडाबाजार, दीपमाळे जवळ, वसई, जि. पालघर
२६) मा. डॉ. गणेश पुंडे (जि. पुणे)
२७) मा. नागोराव कोम्पलवार (ता. जि. यवतमाळ)
२८) मा. डॉ. संजय बर्वे (जि. नागपूर)
२९) मा. संदीप रामदास खेमनर (संगमनेर, जि. अहिल्यानगर)
३०) मा. ॲड. सौ. मंगल विलास कांगणे (कल्याण, जि. ठाणे)
३१) मा. सुवर्णा पाटुकले (जि. सातारा)
३२) मा. संपत मुरकुटे (आर्टीस्ट) (जि. मुंबई)
३३) मा. डॉ. अ. ना. रसनकुटे (विरार, जि. पालघर)
३४) मा. राजेंद्र लाड (शिक्षक) (ता. आष्टी, जि. बीड)
३५) मा. राजेश साबळे (ओतूरकर, उल्हासनगर, जि. ठाणे)
३६) मा. प्रा. डॉ. रामकृष्ण बदने (मुखेड, जि. नांदेड)
३७) मा. उज्वला लुकतुके (डोंबिवली, जि. ठाणे)
३८) मा. अंजली कस्तुरे (जि. संभाजीनगर)
३९) मा. सौ. जयश्री अर्जुन मुंडे (अंबाजोगाई, जि. बीड)
४०) मा. शैलजा करोडे (नवी मुंबई) एकूण साहित्यिक लेखक कवी हे सर्व मानकरी : ४० (चाळीस) सहभागी झाले होते.
तसेच हा कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खालील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
मा. सौ. सुरेखा शिरसाठ (राष्ट्रीय अध्यक्षा),
मा. श्री. रमेश केदार (राष्ट्रीय सरचिटणीस),
मा. डॉ. अलकाताई नाईक-माई (मुख्य मार्गदर्शक),
मा. श्री. भाऊसाहेब फड (राष्ट्रीय उपाध्यक्ष, मीडिया प्रसिद्धी प्रमुख व मुख्य संघटक), मुख्य संपादक महाशक्ती न्युज चैनल
मा. प्रशांत आंधळे (मुख्य सल्लागार व स्वागत कक्ष प्रमुख).
या साहित्य संमेलनासाठी स्वेच्छेने सहभागी होणाऱ्या लेखक, वाचक व रसिकांचे सहर्ष स्वागत करण्यात आले. सहभागासाठी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी विशेष परिश्रम व मेहनत घेतलेले
मा. डॉ. अनिल सांगळे (राष्ट्रीय कार्याध्यक्ष)
आयोजकांच्या वतीने करण्यात आले होते.
या उपक्रमास जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत, महाशक्तीLive न्यूज चॅनल, तसेच अदि शक्ती जगदंबा माता बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनांचे अति महत्वपूर्ण सहकार्य लाभले आहे.
“साहित्य सेवेतून समाजप्रबोधन” या ब्रीदवाक्याला अनुसरून हे संमेलन साहित्यविश्वात एक प्रेरणादायी पर्व ठरले आहे , असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
तसेच डॉ.अनिलजी सांगळे साहेब यांची अतिशय महत्त्व भुमिका असुन सिंहचा वाटा आहे
सर्वत्र डॉ.अनिलजी सांगळे साहेब यांचे कौतुक केले जात आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे