ई-पेपर
सातवे “विश्व वंजारी साहित्य संमेलन”२०२५ व तृतीय वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार व सहभागी सर्व साहित्यिकांचा होणार सन्मान…..
सातवे “विश्व वंजारी साहित्य संमेलन”२०२५ व तृतीय वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार व सहभागी सर्व साहित्यिकांचा होणार सन्मान.....

0
0
5
1
8
3
सातवे “विश्व वंजारी साहित्य संमेलन”२०२५ व तृतीय वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार व सहभागी सर्व साहित्यिकांचा होणार सन्मान…..
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) दिनांक २५/१२/२०२५
महाराष्ट्र नव्हे,भारत नव्हे, संपुर्ण जगातील सर्वच देशामध्ये
मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी व समाजप्रबोधनाच्या हेतूने कार्यरत असलेल्या विश्व वंजारी साहित्य परिषद व आदिशक्ती जगदंबा माता बहुउद्देशीय सेवाभावी प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. २५ डिसेंबर २०२५ रोजी सातवे “विश्व वंजारी साहित्य संमेलन” तसेच संस्थेचा तृतीय वर्धापन दिन ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे.
या साहित्य संमेलनात सहभागी साहित्यिकांचा यथोचित सन्मान करण्यात येणार असून, लेखक, कवी, वाचक व रसिक वर्गासाठी हा एक महत्त्वाचा साहित्यिक उत्सव ठरणार आहे. कार्यक्रम सकाळी ७.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत ऑनलाईन काव्यलेखन व व्हिडिओद्वारे साहित्य वाचन या माध्यमातून पार पडणार आहे.
गुरुवारी सकाळी शुभ मुहूर्तावर ९ वाजता या वेळेत नागपुर येथुन ज्येष्ठ साहित्यिक श्री अशोकजी कांबळे साहेब यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा संपन्न होईल त्यानंतर मुंबई येथुन सन्माननीय शारदाताई खेडकर अध्यक्षस्थानी विराजमान होतील.
तसेच बीड येथुन श्रीमती सुदामतीताई मुंडे या प्रमुख अतिथी उपस्थित राहातील
तसेच या संमेलनामागील प्रमुख उद्दिष्टे म्हणजे साहित्य सेवेतून समाजप्रबोधन, मराठी भाषेचे सक्षमीकरण, तसेच सर्वधर्मसमभाव व विश्वप्रेमी संघटन घडविणे होय. कार्यक्रमात मराठी भाषा, इतिहास, निसर्ग, वर्तमान व भविष्यकालीन विचार, साहित्य, क्रीडा, कला आणि सामान्य ज्ञान या विषयांवर आधारित साहित्यिक सादरीकरण होणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी खालील मान्यवर पदाधिकारी मार्गदर्शन करीत आहेत —
मा. सौ. सुरेखा शिरसाठ (राष्ट्रीय अध्यक्षा),
मा. श्री. रमेश केदार (राष्ट्रीय सरचिटणीस),
मा. डॉ. अलकाताई नाईक-माई (मुख्य मार्गदर्शक),
मा. श्री. भाऊसाहेब फड (राष्ट्रीय उपाध्यक्ष, मीडिया प्रसिद्धी प्रमुख व मुख्य संघटक),
मा. प्रशांत आंधळे (मुख्य सल्लागार व स्वागत कक्ष प्रमुख). या साहित्य संमेलनासाठी स्वेच्छेने सहभागी होणाऱ्या लेखक, वाचक व रसिकांचे सहर्ष स्वागत करण्यात येणार आहे. सहभागासाठी नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी
मा. डॉ. अनिल सांगळे (राष्ट्रीय कार्याध्यक्ष)
मोबाईल : ८४३३८४८७६२
यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
या उपक्रमास जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत, महाशक्तीLive न्यूज चॅनल, तसेच विविध सामाजिक व साहित्यिक संघटनांचे सहकार्य लाभले आहे.
“साहित्य सेवेतून समाजप्रबोधन” या ब्रीदवाक्याला अनुसरून हे संमेलन साहित्यविश्वात एक प्रेरणादायी पर्व ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
0
0
5
1
8
3




