ई-पेपर
आदिशक्ती जगदंबा माता यात्रा उत्सव २०२५ श्री तिर्थक्षेत्र ओझर बु येथे आज पासुन दोन दिवसीय भव्य दिव्य स्वरूपात आयोजन……
आदिशक्ती जगदंबा माता यात्रा उत्सव २०२५ श्री तिर्थक्षेत्र ओझर बु येथे आज पासुन दोन दिवसीय भव्य दिव्य स्वरूपात आयोजन......
0
0
5
1
8
3
आदिशक्ती जगदंबा माता यात्रा उत्सव २०२५ श्री तिर्थक्षेत्र ओझर बु येथे आज पासुन दोन दिवसीय भव्य दिव्य स्वरूपात आयोजन……
महाशक्ती न्युज:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या काठावर वसलेले श्री तिर्थक्षेत्र ओझर बु हे बागायती गाव वसलेले आहे.येथे प्रवरा नदीमध्ये अति प्रचिन व जागृत देवस्थान अदिशक्ती जगदंबा माता अतिशय सुंदर मंदिर आहे.तसेच येथे रांजण खलगे मोठया प्रमाणात आहेत.
ही अदिशक्ती जगदंबा माता हे जागृत देवस्थान असुन संपुर्ण महाराष्ट्रात भक्त परिवार मोठया प्रमाणात आहेत
शुक्रवार दिनांक ०४/०४/२०२५ ते शनिवार ०५/०४/२०२५ दोन दिवसीय भव्य दिव्य स्वरूपात यात्रा उत्सव आयोजित करण्यात आला आहे
आज शुक्रवार दिनांक ०४/०४/२०२५ रोजी सकाळी १० वाजता आदिशक्ती जगदंबा माता पालखी सोहळा व काठी मिरवणुक भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. संध्याकाळी ८ वाजता आतिषबाजी व त्यानंतर ९ वाजता अखंड महाराष्ट्रात गाजत असलेला तमाशारत्न हनुमंतराव देवकाते यांचा तमाशा होईल व शनिवार दिनांक ०५/०४/२०२५ रोजी सकाळी ८ वाजता हनुमंतराव देवकाते यांचा हजेरीचा कार्यक्रम होईल
संध्याकाळी ५ वाजता महाराष्ट्रातील नामवंत पैलवान यांचा कुस्तीचा कार्यक्रम होईल.
तरी ओझर बु व पंचक्रोशीतील भाविक भक्तांना विनंती करण्यात येत आहे कि जास्तीत जास्त भाविक भक्तांनी अदिशक्ती जगदंबा माता दर्शन सोहळा व विविध कार्यक्रमाचा लाभ उपस्थित राहुन घ्यावा.
असे आवाहन समस्त ग्रामस्थ ओझर बु व ओझर बु. यात्रा कमेटी व मुख्य संपादक महा शक्ती न्युज चैनल भाऊसाहेब फड साहेब ओझरकर यांनी केले आहे.
0
0
5
1
8
3




