Breaking
ई-पेपर

महाशिवरात्री व बह्मलिन सद्ग गुरू श्री मानिकगिरी महाराज सतरावी पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने श्रीक्षेत्र वरवंडी आश्रम येथे अखंड हरिनाम सप्ताह व विविध कार्यक्रमाचे आयोजन…..

महाशिवरात्री व बह्मलिन सद्ग गुरू श्री मानिकगिरी महाराज सतरावी पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने श्रीक्षेत्र वरवंडी आश्रम येथे अखंड हरिनाम सप्ताह व विविध कार्यक्रमाचे आयोजन.....

0 0 5 1 8 3
महाशिवरात्री व बह्मलिन सद्ग गुरू श्री मानिकगिरी महाराज सतरावी पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने श्रीक्षेत्र वरवंडी आश्रम येथे अखंड हरिनाम सप्ताह व विविध कार्यक्रमाचे आयोजन…..
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) शुक्रवार दिनांक १३/०२/२०२६ अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीश्रेत्र वरवंडी येथे महा शिवरात्री व बह्मलिन सद्ग गुरू माणिकगिरी महाराज यांची सतरावी पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने बह्मलिन नारायण गिरी महाराज, बिरोबा महाराज,महिपती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व महंत गुरूवर्य रामगिरी महाराज व महंत गुरूवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांच्या आशिर्वादाने व मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन शुक्रवार दिनांक १३/०२/२०२६ ते २०/०२/२०२६ प्रर्यत करण्यात आले आहे.
पहाटे ५ ते ६ काकडा आरती,सकाळी ७ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ५:३० ते ७ हरिपाठ व त्यानंतर ७ ते ९:३० प्रर्यत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार यांचे किर्तन सेवा संपन्न होईल.त्यांनतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
गुरूवार दिनांक १९/०२/२०२६ रोजी बह्मलिन सद्ग गुरू श्री मानिकगिरी महाराज सतरावी पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने सकाळी ८ विधीवत पूजा व आरती करून २० वा अखंड हरिनाम सप्ताहाचे नारळ महंत गुरूवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांच्या शुभहस्ते देण्यात येईल.
व त्यानंतर रात्री ९ ते ११ महंत गुरूवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांचे जाहिर हरी किर्तन सेवा संपन्न होईल
शुक्रवार दिनांक २०/०२/२०२६ रोजी सकाळी १०ते१२ या वेळेत महंत गुरूवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन सेवा संपन्न होईल व त्यांनतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाशिवरात्री व बह्मलिन सद्ग गुरू श्री मानिकगिरी महाराज सतरावी पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या सर्व कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन महंत गुरूवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांनी महाशक्ती न्युजचे मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर यांच्याशी बोलताना केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे