ई-पेपर
श्रीक्षेत्र भामाठाण अडबंगनाथ तपोभूमी येथे संगित रामायण कथा,श्री नवनाथ पारायण व किर्तन महोत्सव व विविध कार्यक्रमासह भव्यदिव्य धर्मनाथ बीज सोहळा संपन्न व युरोप अन कॅनडा येथील भाविक भक्ताची विशेष उपस्थिती…..
श्रीक्षेत्र भामाठाण अडबंगनाथ तपोभूमी येथे संगित रामायण कथा,श्री नवनाथ पारायण व किर्तन महोत्सव व विविध कार्यक्रमासह भव्यदिव्य धर्मनाथ बीज सोहळा संपन्न व युरोप अन कॅनडा येथील भाविक भक्ताची विशेष उपस्थिती.....

0
0
5
1
8
3
श्रीक्षेत्र भामाठाण अडबंगनाथ तपोभूमी येथे संगित रामायण कथा,श्री नवनाथ पारायण व किर्तन महोत्सव व विविध कार्यक्रमासह भव्यदिव्य धर्मनाथ बीज सोहळा संपन्न व युरोप अन कॅनडा येथील भाविक भक्ताची विशेष उपस्थिती…..
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) गुरूवार दिनांक २२/०१/२०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र भामाठाण येथील सुप्रसिध्द देवस्थान ॐचैतन्य अडबंगनाथ तपोभूमी व सद्गुरू नारायण गिरी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने व महंत गुरूवर्य स्वामीजी अरूणगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र भामाठाण येथे मंगळवार दिनांक १३/०१/२०२६ ते बुधवार दिनांक २१/०१/२०२६ प्रर्यत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दिवसभर व रात्रीपण महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
भव्यदिव्य स्वरूपात धर्मनाथ बीज सोहळा व रामायणाचार्य हभप रामरावजी ढोक महाराज यांच्या वाणीतुन संगित रामायण कथा २ते ५ यावेळेत झाली व नवनाथ पारायण सकाळी ७ते११ यावेळेत झाले. पहाटे ४ते ६ यावेळेत काकडा आरती व सायंकाळी ५ते ६ यावेळेत हरिपाठ व तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार यांचे प्रवचन, किर्तन सेवा संपन्न झाली .
मंगळवार दिनांक २०/०१/२०२६ रोजी धर्मनाथ बीज सोहळ्यानिमित्ताने सायंकाळी ७ते९ महंत गुरूवर्य अरूणगिरी महाराज यांची किर्तन सेवा संपन्न झाली.
व बुधवार दिनांक २१/०१/२६ सकाळी १०ते १ यावेळेत महंत गुरूवर्य स्वामीजी अरूणगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन सेवा संपन्न झाली त्यानंतर श्री अविनाशजी भामरे साहेब (आयटी उद्योजक पुणे) यांच्या वतीने काला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते .
तरी या सर्व कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विविध संत महंत व सामाजिक व राजकीय श्रेत्रातील मान्यवर उपस्थित होते
तसेच युरोप अन कॅनडा येथुन ही भाविक भक्त उपस्थित होते त्यांनी हिंदी मधुन आपले मनोगत व्यक्त केले राम कथेस सहभागी झाले व तप शिलेचे दर्शन घेतले व महा प्रसाद घेऊन शिर्डी येथे गेले
या सर्व कार्यक्रमाचा श्रीक्षेत्र भामाठाण व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त व महिला उपस्थित होत्या या सर्व कार्यक्रमाचा लाभ घेतल्याबद्दल सर्वांचे महंत गुरूवर्य स्वामीजी अरूणगिरी महाराज यांनी आभार मांडले
0
0
5
1
8
3




