ई-पेपर
श्रीक्षेत्र ओझर बु येथे नवरात्री निमित्ताने अदिशक्ती जगदंबा माता नवरात्र उत्सव भव्यदिव्य स्वरूपात विविध कार्यक्रमासह संपन्न…..
श्रीक्षेत्र ओझर बु येथे नवरात्री निमित्ताने अदिशक्ती जगदंबा माता नवरात्र उत्सव भव्यदिव्य स्वरूपात विविध कार्यक्रमासह संपन्न.....
0
0
5
1
8
3
श्रीक्षेत्र ओझर बु येथे नवरात्री निमित्ताने अदिशक्ती जगदंबा माता नवरात्र उत्सव भव्यदिव्य स्वरूपात विविध कार्यक्रमासह संपन्न…..
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड)
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या तिरावरती वसलेले व बागायती असलेले श्रीश्रेत्र ओझर बु येथील असलेली अदिशक्ती जगदंबा माता हे जागृत असे देवस्थान आहे
नवरात्री उत्सव सोहळ्यानिमित्ताने सोमवारी दुपारी सप्तश्रृंगी माता नाशिक व महालक्ष्मी माता कोल्हापूर या दोन्ही शक्ती पिठावरून ज्योत मशाल व देवी माता ओझर बु येथे वाजत गाजत भव्य दिव्य स्वरूपात स्वागत करण्यात आले आहे.
देवीची मातेची स्थापना करण्यात आली.
तसेच दररोज सायंकाळी ७ते९ यावेळेमध्ये महाराष्ट्रातील विविध किर्तनकाराचे प्रवचन व कीर्तन आयोजित करण्यात आले होते.त्यांनतर देवीची आरती करण्यात आली व त्यानंतर विविध अन्नदात्याच्या वतीने खिचडी व केळीचा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
विजया दशमी निमित्ताने सकाळी ८ वाजता अदिशक्ती जगदंबा मातेचा होम हवन पुजा व आरती करण्यात आली व त्यानंतर सकाळी १०ते १२ हभप भागवताचार्य बाबा महाराज खामकर पारनेरकर यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते.त्यानंतर आरती करण्यात आली व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ओझर बु येथील ग्रामस्थ, महिला व पंचक्रोशीतील भाविक भक्त उपस्थित होते.
याप्रसंगी अदिशक्ती जगदंबा माता श्रीक्षेत्र ओझर बु येथे भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला.
0
0
5
1
8
3




