Breaking
ई-पेपर

प.पु.गगनगिरी महाराज सेवा आश्रम श्रीक्षेत्र कनोली येथील देवीची मुर्ती श्रीक्षेत्र ओझर बु येथे हभप भागवताचार्य बाबा महाराज खामकर पारनेरकर यांना प.पु.गगनगिरी महाराजाची आठवण व आशिर्वाद म्हणून सुपुर्त…..

प.पु.गगनगिरी महाराज सेवा आश्रम श्रीक्षेत्र कनोली येथील देवीची मुर्ती श्रीक्षेत्र ओझर बु येथे हभप भागवताचार्य बाबा महाराज खामकर पारनेरकर यांना प.पु.गगनगिरी महाराजाची आठवण व आशिर्वाद म्हणून सुपुर्त.....

0 0 5 1 8 3

प.पु.गगनगिरी महाराज सेवा आश्रम श्रीक्षेत्र कनोली येथील देवीची मुर्ती श्रीक्षेत्र ओझर बु येथे हभप भागवताचार्य बाबा महाराज खामकर पारनेरकर यांना प.पु.गगनगिरी महाराजाची आठवण व आशिर्वाद म्हणून सुपुर्त…..

महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब) अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीश्रेत्र कनोली येथील प. पु.श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली येथे नवरात्र उत्सव भक्ती भावाने संपन्न झाले. या नवरात्र उत्सवासाठी दुर्गा मातेची अस्थाई मूर्ती स्थापन केली होती. ती मूर्ती आज विजया दशमी या दिवशी सकाळी १० वाजता अदिशक्ती जगदंबा माता श्रीक्षेत्र ओझर येथे प.पु गगनगिरी महाराज सेवा भक्त परिवार देवीची मुर्ती विसर्जन करण्यासाठी आले होते व ती मुर्ती हभप भागवताचार्य बाबा महाराज खामकर पारनेरकर यांनी पाहिली व विचार विनिमय करून ती मुर्ती विसर्जित केल्या पेक्षा दान म्हणून मागितली व ती मुर्ती प.पु.गगनगिरी महाराज सेवा भक्त परिवार यांनी विचार करून प.पु गगनगिरी महाराजाचा आशिर्वाद व प्रसाद म्हणुन व
देवीला भेट देऊन आरती करून ह. भ. प. भागवताचार्य बाबा महाराज खामकर, पारनेरकर यांना त्यांच्या मागणीनुसार गगनगिरी महाराज आश्रमची आठवण म्हणून देण्यात आली.
ती मूर्ती स्वीकारताना ह. भ. प. बाबा महाराज खामकर तसेच गगनगिरी महाराज आश्रम कनोली चे सेवेकरी श्री रवी खिलारी, वर्पे सर, रामा खेमनर, अक्षय वर्पे, पवन वर्पे, कार्तिक वर्पे, रोशन गुंड, यश वाळुंज, साई वर्पे, ओंकार वाळुंज, तन्वेज खिलारी, गणेश सानप व महा शक्ती न्युज चैनल चे मुख्य संपादक भाऊसाहेब फड आदी मान्यवर उपस्थित होते.
देवीची मूर्ती विसर्जित करण्यापेक्षा महाराजांनी ती आशीर्वाद म्हणून घरी नेली, त्यामुळे भक्त मंडळाने व उपस्थित ओझर बु येथील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. व एकमेकांना विजयादशमीच्या (दसरा) हार्दिक शुभेच्छा दिल्या.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे