भाद्रपद पौर्णिमा उत्सवानिमित्त श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान, भामानगर येथे अडबंगनाथ भजन संध्या,किर्तन भव्य दिव्य सोहळा व महाप्रसादाचे आयोजन……
भाद्रपद पौर्णिमा उत्सवानिमित्त श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान, भामानगर येथे अडबंगनाथ भजन संध्या,किर्तन भव्य दिव्य सोहळा व महाप्रसादाचे आयोजन......
भाद्रपद पौर्णिमा उत्सवानिमित्त श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान, भामानगर येथे अडबंगनाथ भजन संध्या,किर्तन भव्य दिव्य सोहळा व महाप्रसादाचे आयोजन……
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब) अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी तिरावरती श्रीतिर्थश्रेत्र भामाठाण येथील अडबंगनाथ संस्थान आयोजित व सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपा आशीर्वादाने व गुरुवर्य स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांच्या स्नेहळ मार्गदर्शनाखाली या वर्षी रविवार, दि.०७ सप्टेंबर २०२५ रोजी श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान ट्रस्ट, भामानगर (मु.पो. भामाठाण, ता. श्रीरामपूर) येथे भाद्रपद पौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा होणार आहे. भाद्रपद पौर्णिमा या पवित्र सणाच्या निमित्ताने सकाळी ०७ वाजता अडबंगनाथांची प्रार्थना आरती व होम हवन होणार आहे.तदनंतर सकाळी 10 वाजता विदर्भरत्न श्री निळकंठराव तरकासे बाबूजी यांचा अडबंगनाथ संगीत भजन संध्या चा कार्यक्रम होणार आहे.भजन संध्यासाठी राहुल महाराज चेचरे, विशाल महाराज रोकडे, बाबा महाराज मगर साथ संगत करणार आहेत. या अडबंगनाथ भजन संध्येचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. नंतर 11 वाजता ह भ प. विनोदाचार्य बाबा महाराज मगर यांचे सुश्राव्य असे किर्तन होणार आहे. व गुरुवर्य स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद होतील. तदनंतर श्री सुभाष मुरलीधर शिंदे,नादी वैजापूर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक भक्त व श्रद्धाळू यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भगवत कृपा प्राप्त करण्याची संधी साधतील. कारण ही भाद्रपद पौर्णिमा चे महत्व अनन्यसाधारण आहे. या दिवशी जर भगवंताचे नामस्मरण केले तर जन्मोजन्मीचे पाप नष्ट होऊन पुण्याची प्राप्ती होते. म्हणून या भाद्रपद पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.या सोहळ्यात सर्व भाविकांनी सहभागी होऊन भाद्रपद पौर्णिमेच्या पावन पर्वाचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्री क्षेत्र अडबंगनाथ संस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. अडबंगनाथांच्या या भक्तीरसात सर्वांनी सहभागी होऊन अध्यात्माचा अनुभव घ्यावा. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
श्रीक्षेत्र अडबंगनाथ तपोभूमी मंदिर भामानगर या ठिकाणी आपण श्रीरामपूर नेवासा हायवे रोडवरन भोकर या गावातून तपोभूमी मंदिर फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे. तसेच शिर्डी, शिंगणापूर येथून 35 ते 40 किलोमीटर अंतरावर तपोभूमी मंदिर आहे. देवगड येथून ही फक्त 38 किलोमीटर अंतरावर आहे
अडबंगनाथ तपोभूमी मध्ये अन्नदानाला विशेष महत्त्व आहे, या ठिकाणी गुरुवार पौर्णिमा एकादशी निमित्त अन्नदान होते, ज्या भाविकांना अन्नदान करण्याची इच्छा असेल त्यांनी संस्थांशी संपर्क साधावा.
अडबंगनाथ तपोभूमी मंदिर गुरुकुलासाठी, विकासकामासाठी व अन्नदानासाठी तन- मन- धनाने सहकार्य करावे. फोन पे गुगल पे नंबर 9921773005. संस्थान संपर्क 7588605305 / 7020902470
सर्व भाविकांना भाद्रपद पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. व भाद्रपद पौर्णिमेनिमित्त सर्व भाविकांनी उपस्थित रहावे, कारण आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.




