Breaking
ई-पेपर

श्रीक्षेत्र पुंनतगाव पाचेगाव (नेवासा) बाल ब्रह्मचारी साध्वी पुंजामाई माता ते श्रीक्षेत्र ओझर बु अदिशक्ती जगदंबा माता दिंडी सोहळा १० वे वर्षासह संपन्न……

श्रीक्षेत्र पुंनतगाव पाचेगाव (नेवासा) बाल ब्रह्मचारी साध्वी पुंजामाई माता ते श्रीक्षेत्र ओझर बु अदिशक्ती जगदंबा माता दिंडी सोहळा १० वे वर्षासह संपन्न......

0 0 5 1 8 3

श्रीक्षेत्र पुंनतगाव पाचेगाव (नेवासा) बाल ब्रह्मचारी साध्वी पुंजामाई माता ते श्रीक्षेत्र ओझर बु अदिशक्ती जगदंबा माता दिंडी सोहळा १० वे वर्षासह संपन्न……

महाशक्ती न्युज:- अहिल्या नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील श्रीश्रेत्र
पुंनतगाव, पाचेगाव नेवासा येथील बाल ब्रह्मचारी साध्वी पुंजामाई माता ते श्रीक्षेत्र ओझर बु अदिशक्ती जगदंबा माता दिंडी सोहळा सलग१० वे वर्षासह
हभप पंडुरे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भाविक भक्तांसह शुक्रवार दिनांक १८/०७/२०२५ रोजी दुपारी २ वाजता ओझर बु अदिशक्ती जगदंबा माता मंदिराजवळ दाखल झाला व त्यांनतर आदि शक्ती जगदंबा मातेची पुजा आरती करण्यात आली त्यानंतर हभप पंडुरे महाराज यांनी आदि शक्ती जगदंबा माता व बाल ब्रह्मचारी साध्वी पुंजामाई माता यांची सविस्तर माहिती देण्यात आली.
त्यानंतर ओझर बु येथे मा श्री भाऊसाहेब फड साहेब यांच्या घरी मोठ्या उत्साहात दिंडीचे स्वागत करण्यात आले व हभप पंडुरे महाराज यांचे स्वागत व पुजन करण्यात आले व त्यानंतर दिंडी मधील उपस्थित सर्व भाविक भक्तांना सर्वांना पुरण पोळीचा महाप्रसाद देण्यात आला.
व त्यानंतर मा.श्री.भाऊसाहेब फड साहेब व यांच्या परिवाराच्या वतीने हभप पंडुरे महाराजाचा सत्कार करण्यात आला.
व त्यानंतर हभप पंडुरे महाराज व दिंडी यांच्या वतीने मा.श्री. भाऊसाहेब फड साहेब व फड पाटील परिवाराचा सत्कार करण्यात आला.
मा श्री भाऊसाहेब फड साहेब यांनी हभप पंडुरे महाराज यांना विनंती करण्यात आली कि पुढील वर्षीपासून दरवर्षी दिंडी सोहळ्याचे आयोजन करून दिंडी घेऊन यावे व दरवर्षी मा.श्री.भाऊसाहेब फड साहेब यांच्या घरी दिंडी सह महाप्रसादासाठी यावे हे पण हभप पंडुरे महाराज यांनी मान्य करून दरवर्षी यायचे मान्य केले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे