Breaking
ई-पेपर

ब्रम्हलिन सद् गुरू माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज २० वा फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह२०२६ मागणीसाठी श्रीक्षेत्र ओझर बु ते श्रीक्षेत्र वरवंडी भव्य दिव्य मोटारसायकल रॅली सोहळा…..

ब्रम्हलिन सद् गुरू माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज २० वा फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह२०२६ मागणीसाठी श्रीक्षेत्र ओझर बु ते श्रीक्षेत्र वरवंडी भव्य दिव्य मोटारसायकल रॅली सोहळा.....

0 0 5 1 8 3
ब्रम्हलिन सद् गुरू माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज
२० वा फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह२०२६ मागणीसाठी श्रीक्षेत्र ओझर बु ते श्रीक्षेत्र वरवंडी भव्य दिव्य मोटारसायकल रॅली सोहळा…..
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) गुरूवार दिनांक २२/०१/२०२६
अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीश्रेत्र वरवंडी व श्रीश्रेत्र उंबरेश्र्वर सुप्रसिध्द देवस्थान येथे बह्मालिन माणिकगिरी महाराज व महिपती महाराज यांच्या सह अनेक देवता व संत महंताचे मंदिर आहेत.
येथील महंत गुरूवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्य चालत आहे.
बह्मलिन गंगागिरी महाराज, ब्रह्मलिन सद् गुरू नारायण गिरी महाराज व बह्मलिन मानिकगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व महंत गुरूवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रसिध्द असलेला माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज फिरता अखंड हरिनाम सप्ताह २०२६ वर्ष २०वे श्रीक्षेत्र ओझर बु येथे डिसेंबर २०२६ मध्ये आयोजित करण्याचे नियोजन आहे, त्या नुसार सप्ताह चे नारळ घेण्यासाठी बुधवार दिनांक २१/०१/२०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता ओझर बु व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त व सर्व ग्रामस्थ व सर्वच युवक मित्र परिवार व आपली मोटार सायकल घेऊन ओझर बु मारुती मंदिराजवळ उपस्थित राहिले व आपली मोटार सायकल घेऊन सर्वांनी २०वा अखंड हरिनाम सप्ताह सप्ताहचे नारळ घेण्यासाठी
श्रीश्रेत्र ओझर बु ते शेडगाव ते शेडगाव फाटा ते शिपलापुर ते पानोडी ते श्रीक्षेत्र वरवंडी येथे भव्यदिव्य स्वरूपात मोटारसायकल रॅली काढण्यात आली
त्याठिकाणी सर्व प्रथम महंत गुरूवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराजाचा सत्कार करण्यात आला व ॲड लक्ष्मनराव खेमनर श्री दत्तात्रय नागरे श्री अर्जुन हळनर श्री विकास सानप श्री बाचकर बाबा श्री मुख्य संपादक भाऊसाहेब फड यांनी आपले विचार मांडुन २० वा अखंड हरिनाम सप्ताह श्रीक्षेत्र ओझर बु येथे व्हावा व नारळ मिळवा अशी एक मुखी मागणी उपस्थित सर्वांनी केली
त्यानंतर महंत गुरूवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांनी आपले अनमोल विचार व मार्गदर्शन करून १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता बह्मलिन मानिकगिरी महाराज यांची पुण्यतिथी सोहळ्या मध्ये माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज फिरता अखंड हरिनाम सप्ताह २०२६ वर्ष २०वे जाहीर करून सर्वांच्या उपस्थित मध्ये तो ज्या गावचे नाव येईल त्यांना देण्यात येईल.
असे महंत गुरूवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांनी सांगितले व या कार्यक्रमासाठी सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे