Breaking
ई-पेपर

श्रीश्रेत्र हंगेवाडी येथे आजपासून जय हनुमान अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन….

श्रीश्रेत्र हंगेवाडी येथे आजपासून जय हनुमान अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन....

0 0 5 9 2 0

श्रीश्रेत्र हंगेवाडी येथे आजपासून जय हनुमान अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन….

महाशक्ती न्युज
(मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आदर्श गाव हंगेवाडी येथे आजपासून मंगळवार दिनांक ०७/०४/२०२६ ते १४/०४/२०२६ प्रर्यत अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ५ते ७ काकडा आरती भजन,
सायंकाळी ५:३०ते ६:३० हरिपाठ,७ते ९ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकाराची किर्तन सेवा संपन्न होईल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दिनांक ०७/०४/२०२६ सायं.७ते९ हभप गणेश महाराज एरडें यांचे जाहिर हरी किर्तन सेवा होईल
व त्यांनतर श्री गंगाधर सांगळे सर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे‌
बुधवार दिनांक ०८/०४/२०२६ सांय.७ ते ९ हभप अनिल महाराज कडलग यांचे जाहिर हरी किर्तन सेवा होईल.श्री. योगेश कांगणे व संतोष कांगणे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरूवार दिनांक ०९/०४/२०२६ सांय.हभप जयश्री महाराज गावडे यांचे जाहिर हरी किर्तन सेवा होईल.व श्री समस्त कांगणे पाटील परिवार यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक १०/०४/२०२६ हभप दत्ता महाराज नवले यांचा भारूडाचा कार्यक्रम होईल व त्यांनतर श्री.भाऊसाहेब कांगणे व सुनिल व सचिन कांगणे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक ११/०४/२०२६ सांय. ७ ते ९ हभप अनिल महाराज तुपे यांचे जाहिर हरी किर्तन सेवा होईल व त्यानंतर ढोलके मळा यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दिनांक १२/०४/२०२६ सांय ७ ते ९ हभप शरद महाराज ढवले यांचे जाहिर हरी किर्तन सेवा होईल व त्यांनतर श्री जय हनुमान भक्त सेवा मंडळ यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दिनांक १३/०४/२०२६ सांय. हभप सुनिल महाराज यांचे जाहिर हरी किर्तन होईल व त्यानंतर जय गगनगिरी महाराज भक्त सेवा मंडळ हंगेवाडी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दिनांक १४/०४/२०२६ सकाळी ९ वाजता भव्य दिव्य मिरणुक सोहळा संपन्न होईल व त्यानंतर १०ते १२ हभप नंदकिशोर महाराज देवकर यांचे काल्याचे किर्तन सेवा संपन्न होईल व त्यानंतर सौ‌.विमल अशोक कांगणे व अशोक भागोजी कांगणे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी यासर्व कार्यक्रमाचा हंगेवाडी सर्व ग्रामस्थ व महिला व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह कमेटी हंगेवाडी व नियोजक हभप भिमराज सांगळे यांनी महा शक्ती न्युज चैनलशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 9 2 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे