ब्रेकिंग
श्री साईबाबा मंदिर वर्धापनदिन सोहळया निमित्ताने श्री तिर्थक्षेत्र शेडगाव येथे विविध कार्यक्रम संपन्न……….
साईबाबा मंदिर वर्धापनदिन सोहळया निमित्ताने श्री तिर्थक्षेत्र शेडगाव येथे विविध कार्यक्रम संपन्न.....

0
0
2
6
1
6
श्री साईबाबा मंदिर वर्धापनदिन सोहळया निमित्ताने श्री तिर्थक्षेत्र शेडगाव येथे विविध कार्यक्रम संपन्न…..
अहिल्यानगर ( महाशक्ती न्युज) अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र शेडगाव येथील साईबाबा मंदिरात रविवार १० /११/२०२४ ते सोमवार ११/११/२०२४ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
रविवार सकाळी ७ वाजत महा आरती वीणापुजन,पुजापुजन सत्यनारायण पूजा, होम हवन संध्याकाळी ६ते ७ हरिपाठ ७ते ९ हभप सुरेश महाराज नागरे यांचे प्रवचन झाले व यांनतर या वेळेत महाप्रसादाचे आयोजित करण्यात आले होते
सोमवार ११/११/२०२४ रोजी सकाळी ६ ते ७ काकडा आरती सकाळी साईबाबा पादुका पुजन करण्यात आले व सकाळी ९वाजता भव्य दिव्य मिरवणुक साईबाबा मंदिर ते शेडगाव काढण्यात आली
सकाळी १०ते १२ यावेळेत हभप अभिजित महाराज गिरी यांचे जाहीर हरी किर्तन झाले यावेळी हभप सुनिल महाराज पवार यांच्या गुरुकुल आश्रमाचे विद्यार्थी व हभप गोकुळ महाराज पवार व हभप ज्ञानेश्वर महाराज पवार यांच्या सह शेडगाव व मांलुजा भजनीं मंडळ उपस्थित होते श्री संजयगिरी महाराज देशमुख हे उपस्थित होते व त्यानंतर सत्कार करण्यात आला व त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व श्री संभाजी फड सर व श्री संजय नागरे सर यांनी मार्गदर्शन केले यावेळी रक्त दान शिबिर आयोजित करण्यात आले होते व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले सर्व साई भक्त परिवार शेडगाव ग्रामस्थ व महिला व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त उपस्थित होते.
0
0
2
6
1
6