ई-पेपर
७७ वा प्रजासत्ताक दिन ग्रामपंचायत ओझर बु.जिल्हा प्राथमिक शाळा व खंडेराव पाटील खेमनर विद्यालय ओझर बु येथे विविध कार्यक्रमासह साजरा
७७ वा प्रजासत्ताक दिन ग्रामपंचायत ओझर बु.जिल्हा प्राथमिक शाळा व खंडेराव पाटील खेमनर विद्यालय ओझर बु येथे विविध कार्यक्रमासह साजरा

0
0
5
1
8
3
७७ वा प्रजासत्ताक दिन ग्रामपंचायत ओझर बु.जिल्हा प्राथमिक शाळा व खंडेराव पाटील खेमनर विद्यालय ओझर बु येथे विविध कार्यक्रमासह साजरा
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या तिरावरती वसलेले ओझर बु येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन ग्रामपंचायत कार्यालय ओझर बु सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व तलाठी विविध मान्यवर व सर्व ग्रामस्थ व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.त्यांनतर खंडेराव पाटील खेमनर विद्यालय ओझर बु येथे ही ७७ वा प्रजासत्ताक दिन हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर व मुख्याध्यापक व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझर बु येथे ही ७७ वा प्रजासत्ताक दिन हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर व शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी व पालक व महिला यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले विविध कवायती व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले व त्यानंतर विद्यार्थ्यांचे भाषण झाले
विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये विविध प्रमाणात पत्र सन्मान चिन्ह मिळवले आहे त्याचे वाटप उपस्थित विविध मान्यवराच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.
या प्रसंगी हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर. हभप नारायण तात्या थोरात श्री व ॲड लक्ष्मनरराव खेमनर श्री संदिप नागरे श्री सुभाष खेमनर गबाजी खेमनर,अर्जुन हळनर जितेंद्र सानप संजय नागरे मारुती नागरे माधव नागरे अस्लाम पठाण रेवजी बिडगर माधव नागरे राजेंद्र हळनर मनोज हळनर सचिन खेमनर मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब यांच्या सह शाळांचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व अंगणवाडी सेविका व सर्व विद्यार्थी व पालक व महिला व ओझर बु येथील सर्व ग्रामस्थ मोठया प्रमाणावर उपस्थित होते
यावेळी विद्यालयातील खेमनर सर वाघमारे सर केसकर सर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक व विद्यार्थी व हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर व ॲड लक्ष्मनराव खेमनर यांनी आपले अनमोल विचार मांडले
0
0
5
1
8
3




