ई-पेपर
श्रीक्षेत्र भामाठाण अडबंगनाथ तपोभूमी येथे संगित रामायण कथा,श्री नवनाथ पारायण व किर्तन महोत्सव व भव्यदिव्य धर्मनाथ बीज सोहळ्यामध्ये महंत गुरूवर्य स्वामीजी अरूणगिरी महाराज यांच्या समवेत महंत गुरूवर्य स्वामीजी कैलासगिरी महाराज व नाथयोगिरी अव्ककाताई बाबा महाराज नाथाश्रम वेरूळ यांची सदिच्छा भेट….
श्रीक्षेत्र भामाठाण अडबंगनाथ तपोभूमी येथे संगित रामायण कथा,श्री नवनाथ पारायण व किर्तन महोत्सव व भव्यदिव्य धर्मनाथ बीज सोहळ्यामध्ये महंत गुरूवर्य स्वामीजी अरूणगिरी महाराज यांच्या समवेत महंत गुरूवर्य स्वामीजी कैलासगिरी महाराज व नाथयोगिरी अव्ककाताई बाबा महाराज नाथाश्रम वेरूळ यांची सदिच्छा भेट....

0
0
5
1
8
3
श्रीक्षेत्र भामाठाण अडबंगनाथ तपोभूमी येथे संगित रामायण कथा,श्री नवनाथ पारायण व किर्तन महोत्सव व भव्यदिव्य धर्मनाथ बीज सोहळ्यामध्ये महंत गुरूवर्य स्वामीजी अरूणगिरी महाराज यांच्या समवेत महंत गुरूवर्य स्वामीजी कैलासगिरी महाराज व नाथयोगिरी अव्ककाताई बाबा महाराज नाथाश्रम वेरूळ यांची सदिच्छा भेट….
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर) सोमवार दिनांक १९/०१/२०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र भामाठाण येथील सुप्रसिध्द देवस्थान ॐचैतन्य अडबंगनाथ तपोभूमी व सद्गुरू नारायण गिरी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने व महंत गुरूवर्य स्वामीजी अरूणगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र भामाठाण येथे मंगळवार दिनांक १३/०१/२०२६ ते बुधवार दिनांक २१/०१/२०२६ प्रर्यत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दिवसभर व रात्रीपण महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
भव्यदिव्य स्वरूपात धर्मनाथ बीज सोहळा व रामायणाचार्य हभप रामरावजी ढोक महाराज यांच्या वाणीतुन संगित रामायण कथा २ते ५ यावेळेत होईल व नवनाथ पारायण सकाळी ७ते११ यावेळेत होईल. पहाटे ४ते ६ यावेळेत काकडा आरती होईल.व सायंकाळी ५ते ६ यावेळेत हरिपाठ होईल व तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार यांचे प्रवचन, किर्तन सेवा संपन्न होईल.
तसेच रविवार १८/०१/२०२६ रोजी दुपारी २ वाजता महंत गुरूवर्य स्वामीजी अरूणगिरी महाराज यांच्या समवेत महंत गुरूवर्य स्वामीजी कैलासगिरी महाराज व नाथयोगिरी अव्ककाताई बाबा महाराज नाथाश्रम वेरूळ यांनी वेळात वेळ काढून सदिच्छा भेट दिली व आपले अनमोल विचार मांडले
तसेच मंगळवार दिनांक २०/०१/२०२६ रोजी धर्मनाथ बीज सोहळ्यानिमित्ताने सायंकाळी ७ते९ महंत गुरूवर्य अरूणगिरी महाराज यांची किर्तन सेवा संपन्न होईल.
व बुधवार दिनांक २१/०१/२६ सकाळी १०ते १ यावेळेत महंत गुरूवर्य स्वामीजी अरूणगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन सेवा संपन्न होईल त्यानंतर श्री अविनाशजी भामरे साहेब (आयटी उद्योजक पुणे) यांच्या वतीने काला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या सर्व कार्यक्रमाचा श्रीक्षेत्र भामाठाण व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त व महिलांनी उपस्थित राहुन या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महंत गुरूवर्य स्वामीजी अरूणगिरी महाराज यांनी केले आहे.
0
0
5
1
8
3




