क्रिडा व मनोरंजन
अकलापुर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये जगदंबा 11 क्रिकेट क्लब ओझर बु संघास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान…..
अकलापुर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये जगदंबा 11 क्रिकेट क्लब ओझर बु संघास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान.....

0
0
2
6
1
6
अकलापुर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये जगदंबा 11 क्रिकेट क्लब ओझर बु संघास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान…..
महाशक्ती न्युज:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घारगाव जवळ अकलापुर येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये अहिल्यानगर, नाशिक,पुणे,ठाणे या परिसरातील अनेक संघांनी सहभाग घेतला होता.ही स्पर्धा अटीतटीची खुपच संघर्षमय झाली.
या क्रिकेट स्पर्धेमध्ये जगदंबा 11 क्रिकेट क्लब ओझर बु या संघाने फायनलमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.
हे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक फायनल मेंच झाल्यानंतर अकलापुरचे सरपंच, उपसरपंच,पोलिस पाटील व क्रिकेट आयोजन समिती विविध मान्यवर व क्रिकेट रसिकांच्या उपस्थितीमध्ये सन्मान पुर्वक जगदंबा 11 क्रिकेट क्लबचे सर्व खेळाडू व संघाचे मार्गदर्शक व जेष्ठ खेळाडू ललितभाऊ मोरे यांना देण्यात आला.
अकलापुर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये जगदंबा 11 क्रिकेट क्लब ओझर बु संघास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल संघाचे श्री रावसाहेब फड (मुंबई पोलीस, कॅप्टन जगदंबा क्रिकेट क्लब)
श्री बाळासाहेब वने (मुंबई पोलीस)
श्री संदिप नागरे (Psi)
मेजर अण्णासाहेब फड
श्री महेश नागरे
श्री ललित मोरे मार्गदर्शक ( जगदंबा 11 क्रिकेट क्लब ओझर बु)
श्री अस्लाम पठाण
श्री भाऊसाहेब फड मुख्य संपादक महाशक्ती न्युज) यांच्या सह सर्व समस्त ग्रामस्थ,मित्र परिवार व आजी माजी क्रिकेटपटू यांच्या सह ओझर बु व पंचक्रोशीत अभिनंदन व स्वागत केले जात आहे.
0
0
2
6
1
6