Breaking
ई-पेपर

श्रीश्रेत्र कनकापुर येथे ९ वा वर्धापनदिन व  पंचदिनी हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सह  विविध कार्यक्रमाचे आयोजन…..

श्रीश्रेत्र कनकापुर येथे ९ वा वर्धापनदिन व  पंचदिनी हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सह  विविध कार्यक्रमाचे आयोजन.....

0 0 5 1 8 5
श्रीश्रेत्र कनकापुर येथे ९ वा वर्धापनदिन व  पंचदिनी हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सह  विविध कार्यक्रमाचे आयोजन…..
महाशक्ती न्युज
(मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
रविवार दिनांक २२/०२/२०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीश्रेत्र कनकापुर येथे ९ वा वर्धापनदिन व पंचदिनी हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बह्म लीन गंगागिरी महाराज ब्रह्म लीन नारायणगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व महंत गुरूवर्य सद् गुरू रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली लेने को हरिनाम|
देने को अन्नदान||
तरने को लिनता|
डुबने को अभिमान||
कनकापुर येथील गणपती मुर्ती, विठ्ठल रुक्मिणी माता, खोकल्याई देवी,महादेव पिंड, दक्षिण मुखी हनुमान व नारायणगिरी महाराज पादुका या सर्वांचा ९ वा वर्धापनदिन सोहळया निमित्ताने पंचदिनी हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण यासह पहाटे ४ते६ काकडा आरती सकाळी ८:३० ते १ वाजेपर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, सायंकाळी ५ते ६ हरिपाठ व ७ते ९ या वेळात  महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार यांची किर्तन सेवा संपन्न होईल.
शनिवार २१/०२/२०२६ हभप मधुसुदन महाराज (सरलाबेट) किर्तन होईल व त्यांनतर एकलव्य ग्रुप यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दिनांक २२/०२/२०२६ रोजी सायंकाळी ७ते९ हभप अंनत महाराज काळे (मेढवण) यांची किर्तन सेवा संपन्न होईल व त्यांनतर कै.मुक्ताजी पचपिड यांच्या स्मरणार्थ श्री अनिल पचपिंड यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दिनांक २३/०२/२०२६ रोजी सायंकाळी ७ते९ हभप यशवंत महाराज थोरात (ढवळपुरी) यांचे किर्तन सेवा संपन्न होईल व त्यांनतर मळेकरी सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दिनांक २४/०२/२०२६ रोजी सायंकाळी हभप अर्जुन महाराज (सरलाबेट) यांची किर्तन सेवा संपन्न होईल व त्यांनतर गावठाण सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
व बुधवार दिनांक २५/०२/२०२६ रोजी सकाळी ९ वाजता कनकापुर संपूर्ण गावातुन भव्यदिव्य स्वरूपात मिरवणुक काढण्यात येईल व त्यानंतर ११ते १ वाजेपर्यंत महंत गुरूवर्य रामगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन सेवा संपन्न होईल व त्यांनतर कनकापुर सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ चालक हभप गणपत तुकाराम शिंदे व ५ दिवस पाणी जार सहकार्य अण्णासाहेब श्रीकिसन शिंदे यांच्या वतीने
तरी कनकापुर सर्व ग्रामस्थ व महिला, भाविक भक्त व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त सर्व ग्रामस्थ कनकापुर सर्व सप्ताह कमेटी यांनी महाशक्ती न्युज चैनलशी बोलताना केले आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे