ब्रेकिंग
प.पु गगनगिरी महाराज सेवा आश्रम तपपूर्ती सोहळ्या निमित्ताने श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांचे श्री तिर्थक्षेत्र कनोली येथे शिवमहापुराण कथेचे सहावे पुष्प संपन्न….
प.पु गगनगिरी महाराज सेवा आश्रम तपपूर्ती सोहळ्या निमित्ताने श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांचे श्री तिर्थक्षेत्र कनोली येथे शिवमहापुराण कथेचे सहावे पुष्प संपन्न....

0
0
2
6
1
7
प.पु गगनगिरी महाराज सेवा आश्रम तपपूर्ती सोहळ्या निमित्ताने श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांचे श्री तिर्थक्षेत्र कनोली येथे शिवमहापुराण कथेचे सहावे पुष्प संपन्न…..
अहिल्यानगर (महाशक्ती न्युज) अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र कनोली येथील प.पु.श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम तपपूर्ती सोहळया निमित्ताने श्री.श्री. १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांचे शुक्रवार ०८/११/२०२४ ते गुरुवार १४/११/२०२४ या कालावधीत संध्याकाळी ६ते ९ या वेळेत शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे.
सकाळी ६ वाजता अभिषेक व विधीवत पुजा आरती व १० वाजता होम हवन पुजा व १२ वाजता आरती व मेडिकव्हर हांस्पिटल व अर्पण ब्लड बँक संगमनेर तसेच गगनगिरी महाराज भक्त परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने दररोज संध्याकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत मोफत सर्व रोग निदान शिबिर व तसेच रक्तदान शिबीर आयोजित केले आहे
संध्याकाळी ७ वाजता शिव महापुराण कथेस सुरुवात झाली व उपस्थित सर्व साधु संताचे पुजन व सत्कार करण्यात आला व त्यानंतर
गोकर्ण व अनुसया, अगस्ती ऋषी, राम लक्ष्मण,आंकई,
घरातील दोष,प्रदोष, गोमाता,चुल,कुत्रा,
व स्वामी गगनगिरी महाराज व स्वामी जनार्दन यांच्या जीवन कार्यावरती महिती देण्यात आली व त्यानंतर ९ :३० वाजता साधु संतांच्या उपस्थित व भाविक भक्तांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली यावेळी सौ.धनश्री सुजय विखे पाटील यांनी सदिच्छा भेट दिली व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते
या कार्यक्रमाचा लाभ प.पु.स्वामी गगनगिरी महाराज सर्व भक्त परिवार कनोली व पंचक्रोशीतील सर्वच भाविक भक्त लाभ घेत आहेत.
0
0
2
6
1
7