Breaking
ब्रेकिंग

आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे सातवे उन्हाळी अधिवेशन जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे व पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न.‌‌….

आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे सातवे उन्हाळी अधिवेशन जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे व पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न.‌‌....

0 0 5 1 8 3

आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे सातवे उन्हाळी अधिवेशन जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णासाहेब हजारे व पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न.‌‌….

महाशक्ती न्युज:- अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आदर्श गाव राळेगणसिद्धी येथे मंगळवार, दिनांक ३ जून २०२५ रोजी, जागतिक स्तरावर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे दरवर्षी प्रमाणे चालू वर्षे २०२५ चे सातवे उन्हाळी अधिवेशन नवलभाऊ फिरोदिया सभागृह,राळेगणसिद्धी,ता.पारनेर,जि.
अहिल्यानगर या ठिकाणी जेष्ठ समाजसेवक पद्मश्री पद्मभूषण डॉ.अण्णासाहेबजी हजारे यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात पार पडले.
दरवर्षी प्रमाणे अधिवेशनाची सुरुवात राळेगणसिद्धी गावात पर्यावरण संरक्षण च्या घोषणा तसेच टाळांच्या गजरात संप्रदायिक भजनाने वृक्ष दिंडी काढण्यात आली.
त्यानंतर जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिवेशनाची सुरुवात सामुहिक पध्दतीने देशी वृक्षाचे रोपण करून करण्यात आले.
संस्थेच्या या राष्ट्रीय अधिवेशनासाठी अधिवेशन उद्घाटक म्हणून जेष्ठ समाजसेवक लोकपाल जनक पद्मश्री पद्मभूषण डॉ.अण्णासाहेबजी हजारे आणि अधिवेशन अध्यक्ष म्हणून पद्मश्री पुरस्कार प्राप्त बीजमाता सौ.राहिबाई पोपेरे यांची विशेष उपस्थिती होती. या अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून से.नी.आय.पी.एस.विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह,महाराष्ट्र राज्याचे डॉ.श्री.विठ्ठलराव जाधव, पोलीस दलात राष्ट्रपती पुरस्कार विजेते पोलीस उपअधिक्षक,फोर्स वन युनिट,महाराष्ट्र राज्याचे श्री.संतोष गायके, सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन,विशाखापट्टणमचे ॲड.डॉ.चेन्ना सरत बाबू, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.रागिणी चवरे, आधार महिला मंडळ,शाहूनगरच्या संस्थापिका सौ.सुप्रिया चांदगुडे, पुणे शहर पोलीस श्री.ज्ञानेश्वर कुंभार, पुणे शहर पोलीस श्री.विजय काकडे, पुणे शहर पोलीस श्री.ज्योतिराम मोरे, आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.देवा तांबे इत्यादी उपस्थित होते.
या अधिवेशन सोहळ्यात संस्थेच्या अंतर्गत देशात पर्यावरण, सामाजिक अशा विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून पदाधिकारी व सदस्य यांना वेगवेगळ्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.          यावेळी सर्व पुरस्कारार्थी यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या ३२ व्या जन्म दिनानिमित्त कापडी पिशव्या तसेच देशी वृक्षांच्या बियांचे वाटप करण्यात आले. यावेळी विशेष उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख पाहुणे यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. हा अधिवेशनाचा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थेच्या महाराष्ट्र राज्य नियोजन समिती तसेच महाराष्ट्र राज्य महिला व पुरस्कार पदाधिकारी यांनी विशेष योगदान दिले.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाशक्ती न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 1 8 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे