ई-पेपर
महाशिवरात्री व बह्म लीन माणिकगिरी महाराज सतरावी पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने श्रीक्षेत्र वरवंडी आश्रम येथे अखंड हरिनाम सप्ताहसह विविध कार्यक्रम संपन्न……
महाशिवरात्री व बह्म लीन माणिकगिरी महाराज सतरावी पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने श्रीक्षेत्र वरवंडी आश्रम येथे अखंड हरिनाम सप्ताहसह विविध कार्यक्रम संपन्न......

0
0
5
1
8
3
महाशिवरात्री व बह्म लीन माणिकगिरी महाराज सतरावी पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने श्रीक्षेत्र वरवंडी आश्रम येथे अखंड हरिनाम सप्ताहसह विविध कार्यक्रम संपन्न……
महाशक्ती Live न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
शनिवार २१/०२/२०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीश्रेत्र वरवंडी आश्रम येथे महाशिवरात्री व बह्म लीन सद्गुरू माणिक गिरी महाराज यांची सतरावी पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने बह्म लीन नारायण गिरी महाराज, बिरोबा महाराज,महिपती महाराज, यांच्या कृपाशीर्वादाने व महंत गुरूवर्य रामगिरी महाराज व महंत गुरूवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन शुक्रवार दिनांक १३/०२/२०२६ ते २०/०२/२०२६ या कालावधीत संपन्न झाला.
पहाटे ४ते ६ काकडा आरती सकाळी ७ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.सायंकाळी ५:३० ते ७ हरीपाठ त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार यांचे किर्तन सेवा संपन्न झाली व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुवारी १९/०२/२०२६ रोजी बह्म लीन माणिकगिरी महाराज सतरावी पुण्यतिथी सोहळ्या निमित्ताने सकाळी ८ वाजता विधीवत पूजा आरती करण्यात आली.
त्यानंतर ब्रह्म लीन माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज २१ वा अखंड हरिनाम सप्ताहाचा नारळ श्रीक्षेत्र ओझर बु येथील उपस्थित सर्व ग्रामस्थ व सर्व भाविक भक्ता समवेत श्रीक्षेत्र ओझर बु गावास देण्यात आला.
व रात्री ९ते ११ यावेळेत महंत गुरूवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांची किर्तन सेवा संपन्न झाली
शुक्रवार दिनांक २०/०२/२०२६ रोजी सकाळी १० ते१२ यावेळेत महंत गुरूवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज यांचे काल्याची किर्तन सेवा संपन्न झाली यावेळी बह्म लीन माणिकगिरी महाराज जीवन चरित्र पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी भजनी मंडळ व भाविक भक्त व माणिक गिरी महाराज परिवारातील सदस्य उपस्थित होते.
हा अखंड हरिनाम सप्ताह व सोहळा यशस्वी करण्यासाठी महंत गुरूवर्य स्वामीजी दत्तगिरी महाराज व त्यांचा भक्त परिवार व भजनी मंडळ सर्व ग्रामस्थ व महिला व तरुण मित्र परिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
0
0
5
1
8
3




