ई-पेपर
निःस्वार्थ सेवेला राज्याचा मान मा. डॉ. अनिल सांगळे यांना निःस्वार्थ सामाजिक कार्य राज्यस्तरीय पुरस्कार २०२५ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान……
निःस्वार्थ सेवेला राज्याचा मान मा. डॉ. अनिल सांगळे यांना निःस्वार्थ सामाजिक कार्य राज्यस्तरीय पुरस्कार २०२५ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान......

0
0
5
1
8
4
निःस्वार्थ सेवेला राज्याचा मान
मा. डॉ. अनिल सांगळे यांना निःस्वार्थ सामाजिक कार्य राज्यस्तरीय पुरस्कार २०२५ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान……
महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
मुंबई, दि.— प्रीतगंध फाउंडेशन मुंबईच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय सन्मान सोहळा मराठी ग्रंथालय, दादर (मुंबई पूर्व) येथे उत्साहात पार पडला. समाजसेवा, जनजागृती, पर्यावरण आणि मानवकल्याण क्षेत्रात सातत्यपूर्ण व प्रभावी योगदानाबद्दल सन्मा. डॉ. अनिल सांगळे यांना प्रतिष्ठित निःस्वार्थ सामाजिक कार्य राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला राज्यव्यापी स्वरूप लाभले. आकर्षक सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन डॉ. सांगळे यांचा सत्कार करण्यात आला.
सन्मान स्वीकारताना डॉ. सांगळे म्हणाले
हा सन्मान समाजातील संवेदनशील हातांच्या एकत्रित सेवाभावाचा आहे.
समारोप प्रसंगी संस्थेतर्फे उपस्थित मान्यवर, पाहुणे व माध्यम प्रतिनिधींचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
डॉ अनिल सांगळे साहेब यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले सर्वत्र व महाशक्ती न्युज चैनल व जय भगवान राष्ट्रीय सेवा महाशक्ती भारत व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व मनःपुर्वक शुभेच्छा
0
0
5
1
8
4




