ई-पेपर
श्रीतिर्थश्रेत्र कनकापुर येथे पंचदिनी हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भव्य दिव्य स्वरूपात संपन्न……
श्रीतिर्थश्रेत्र कनकापुर येथे पंचदिनी हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भव्य दिव्य स्वरूपात संपन्न......

0
0
2
6
1
6
श्रीतिर्थश्रेत्र कनकापुर येथे पंचदिनी हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भव्य दिव्य स्वरूपात संपन्न……
महाशक्ती न्युज (मुख्य संपादक भाऊसाहेब फड) अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीश्रेत्र कनकापुर येथे लेने को हरिनाम| देने को अन्नदान|| तरने को लीनता| डुबन को अभिमान||
बह्मलिन योगीराज गंगागिरी महाराज व बह्मलिन नारायण गिरी महाराज यांच्या कृपाशिवादाने महंत रामगिरी महाराज (मठाधिपती सरलाबेट) यांच्या कृपाशिवादाने श्री तिर्थक्षेत्र कनकापुर येथे गणपती मुर्ती, विठ्ठल रुक्मिणी माता,खोकल्याई देवी, महादेव पिंड दक्षिण मुखी हनुमान, गुरुवर्य नारायणगिरी महाराज पादुका व हनुमान मंदिराचा आठवा वर्धापनदिन निमित्ताने हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
फाल्गुन शु.५ मंगळवार दिनांक ०४/०३/२०२५ ते फाल्गुन शु.०८/०३/२०२५ प्रर्यत हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता.
पहाटे ४ते ६ काकडा आरती ८:३० ते १ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ५ते६ हरिपाठ ७:००ते ९:०० या वेळेत जाहिर हरी किर्तन सोहळा त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
मंगळवार दिनांक ०४/०३/२०२५ रोजी हभप राजेश्वरगिरी महाराज यांचे जाहीर हरी किर्तन झाले व त्यानंतर एकलव्य ग्रुप यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
बुधवार दिनांक ०५/०३/२०२५ रोजी हभप प्रकाश महाराज यांचे जाहीर किर्तन झाले. त्यानंतर कै.सुलोचनाबाई शिंदे यांच्या स्मरणार्थ श्री बाबासाहेब शिंदे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
शुक्रवार दिनांक
०६/०३/२०२५ रोजी हभप काशिनाथ महाराज पोमनर आळंदीकर यांचे जाहीर हरी किर्तन झाले. त्यानंतर मळेकर ग्रामस्थ यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
शुक्रवार
दिनांक ०७/०३/२०२४ हभप गोविंद महाराज महाराज मलिक यांचे जाहीर किर्तन झाले व त्यानंतर गावठाण ग्रामस्थ यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
शनिवार दिनांक ०८/०३/२०२५ रोजी सकाळी १० वाजता भव्य दिव्य मिरवणूक संपुर्ण कनकापुर गावातुन काढण्यात आली व त्यानंतर हभप महंत रामगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले. व त्यानंतर समस्त ग्रामस्थ कनकापुर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होत यावेळी कनकापुर सर्व ग्रामस्थ व महिला सर्व भाविक भक्त व पंचक्रोशीतील भाविक भक्त उपस्थित होते.
समस्त कनकापुर सप्ताह कमेटी व समस्त ग्रामस्थ कनकापुर यांनी विशेष परिश्रम घेतले.
व.रात्री ८ वाजता छावा या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते.
0
0
2
6
1
6