ई-पेपर
श्रीश्रेत्र हंगेवाडी येथे भव्यदिव्य स्वरूपात जय हनुमान अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन…..
श्रीश्रेत्र हंगेवाडी येथे भव्यदिव्य स्वरूपात जय हनुमान अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन.....

0
0
5
9
2
0
श्रीश्रेत्र हंगेवाडी येथे भव्यदिव्य स्वरूपात जय हनुमान अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन…..
महाशक्ती न्युज
(मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आदर्श गाव हंगेवाडी येथे आजपासून मंगळवार दिनांक ०७/०४/२०२६ ते १४/०४/२०२६ प्रर्यत अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ५ते ७ काकडा आरती भजन,
सायंकाळी ५:३०ते ६:३० हरिपाठ,७ते ९ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकाराची किर्तन सेवा संपन्न होईल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दिनांक ०७/०४/२०२६ सायं.७ते९ हभप गणेश महाराज एरडें यांचे जाहिर हरी किर्तन सेवा होईल
व त्यांनतर श्री गंगाधर सांगळे सर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
बुधवार दिनांक ०८/०४/२०२६ सांय.७ ते ९ हभप अनिल महाराज कडलग यांचे जाहिर हरी किर्तन सेवा होईल.श्री. योगेश कांगणे व संतोष कांगणे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरूवार दिनांक ०९/०४/२०२६ सांय.हभप जयश्री महाराज गावडे यांचे जाहिर हरी किर्तन सेवा होईल.व श्री समस्त कांगणे पाटील परिवार यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक १०/०४/२०२६ हभप दत्ता महाराज नवले यांचा भारूडाचा कार्यक्रम होईल व त्यांनतर श्री.भाऊसाहेब कांगणे व सुनिल व सचिन कांगणे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक ११/०४/२०२६ सांय. ७ ते ९ हभप अनिल महाराज तुपे यांचे जाहिर हरी किर्तन सेवा होईल व त्यानंतर ढोलके मळा यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दिनांक १२/०४/२०२६ सांय ७ ते ९ हभप शरद महाराज ढवले यांचे जाहिर हरी किर्तन सेवा होईल व त्यांनतर श्री जय हनुमान भक्त सेवा मंडळ यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दिनांक १३/०४/२०२६ सांय. हभप सुनिल महाराज यांचे जाहिर हरी किर्तन होईल व त्यानंतर जय गगनगिरी महाराज भक्त सेवा मंडळ हंगेवाडी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दिनांक १४/०४/२०२६ सकाळी ९ वाजता भव्य दिव्य मिरणुक सोहळा संपन्न होईल व सायंकाळी ६ ते७ हरिपाठ होईल व त्यानंतर सायंकाळी ७ते९हभप नंदकिशोर महाराज देवकर यांचे काल्याचे किर्तन सेवा संपन्न होईल व त्यानंतर सौ.विमल अशोक कांगणे व अशोक भागोजी कांगणे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी यासर्व कार्यक्रमाचा हंगेवाडी सर्व ग्रामस्थ व महिला व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह कमेटी हंगेवाडी व नियोजक हभप भिमराज सांगळे यांनी महा शक्ती न्युज चैनलशी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले.
0
0
5
9
2
0




