ई-पेपर
गुरूवर्य स्वामी अरूणनाथगिरी महाराज यांचा भव्य दिव्य अभिष्टचिंतन सोहळा व सत्संग विचार मंथन सोहळ्यासह विविध कार्यक्रमाचे आज मंगळवारी दुपारी ४ वाजता आयोजन…..
गुरूवर्य स्वामी अरूणनाथगिरी महाराज यांचा भव्य दिव्य अभिष्टचिंतन सोहळा व सत्संग विचार मंथन सोहळ्यासह विविध कार्यक्रमाचे आज मंगळवारी दुपारी ४ वाजता आयोजन.....

0
0
5
1
8
5
गुरूवर्य स्वामी अरूणनाथगिरी महाराज यांचा भव्य दिव्य अभिष्टचिंतन सोहळा व सत्संग विचार मंथन सोहळ्यासह विविध कार्यक्रमाचे आज मंगळवारी दुपारी ४ वाजता आयोजन…..
महाशक्ती न्युज ( मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब) अहिल्या नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी तिरावरती श्रीतिर्थश्रेत्र भामाठाण येथील सुप्रसिध्द देवस्थान अडबंगनाथ स्वामी येथील महंत गुरूवर्य स्वामीजी अरुणनाथगिरी महाराज यांचा भव्यदिव्य अभिष्टचिंतन सोहळा व सत्संग विचार मंथन सोहळ्यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दिनांक ०४/११/२०२५ रोजी दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे
महंत गुरूवर्य स्वामीजी अरूणनाथगिरी महाराज यांचा अल्प परिचय मी भाऊसाहेब फड साहेब मुख्य संपादक महा शक्ती न्युज चैनल च्या वतीने मी मांडत आहे गुरू वर्य स्वामी अरूणनाथगिरी महाराज बालपणीचे नाव अरुण रमेश औताडे.यांचा जन्म गंगापूर तालुक्यातील आगाठाण या खेडेगावामध्ये झाला.समिंदराबाई रमेशराव पाटील औताडे हे स्वामी महाराजांचे आई-वडील. महाराजांना त्यांचे आजोबा शामराव पाटील जगताप यांच्यापासून अध्यात्माची लहानपणीच आवड लागलेली होती. त्यामुळे वयाच्या आठव्या वर्षी स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांनी घरदार सोडले व पुन्हा घरी गेले नाहीत. वयाच्या आठव्या वर्षी सद्गुरु नारायणगिरीजी महाराज सरला बेट या ठिकाणी स्वामी महाराज गेले. सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांना सद्गुरु केले व त्यानंतर नारायणगिरी महाराजांनाच आपले आई-वडील मानून संपूर्ण जीवन नारायणगिरी बाबांच्या चरणी अर्पण केले. स्वतः बाबांनी स्वामी महाराजांना नऊ दिवस उजळणी शिकवली. सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने स्वामी अरुणनाथगिरी महाराजांना वाचता लिहिता येऊ लागले. तेव्हा बंकटस्वामींची भजनी मालिका सहा महिन्यातच पाठ केली. सर्व धार्मिक ग्रंथांचे अध्ययन सद्गुरु नारायणगिरी महाराजांकडे स्वामी महाराजांनी केले. सद्गुरूंचा आशीर्वाद व स्वामी अरुणनाथगिरी महाराजांच्या अभ्यासाची चिकाटी यातून संगीत रामायण कथा,भागवतकथा, महाराज करू लागले. स्वामीजी नवनाथ कथेचे संपूर्ण अध्ययन करून संगीत नवनाथ कथा ही महाराज करतात. नवनाथ कथा करणारे भारतामधील पहिले नवनाथ कथा प्रवक्ते स्वामी अरुणनाथगिरी महाराज आहेत. सद्गुरु नारायणगिरीजी महाराज सरला बेट या ठिकाणी स्वामी अरुणनाथगिरी महाराजांनी बारा वर्षे कोठीची सेवा केली व त्या ठिकाणी विद्या अध्ययन केले. स्वामी महाराजांचा अभ्यास व सद्गुरूंची मनोभावे सेवा यामुळे स्वामी महाराज सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांचे सर्वात लाडके शिष्य आहेत. सद्गुरु नारायणगिरी महाराज स्वामीजींना लाडाने रतनलाल म्हणून हाक मारायचे. बेटातील सर्वात लहान व बाबांचे सर्वात लाडके शिष्य म्हणजे स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांनी पाच वर्षे संपूर्ण भारताची पाई तीर्थ यात्रा केली. व 2000 साली . सद्गुरु नारायणगिरीजी यांच्यावर निषीम श्रद्धा असल्यामुळे . स्वामीजी सरला बेटावर आले.
स्वामी महाराज तपसाधना व मंदिर निर्मित विजयादशमीच्या मुहूर्तावर मुठे वस्तीवरील जनार्दन बाबा मुठे, सद्गुरु नारायणगिरीजी महाराज व मुठेबाबांचे श्रीकृष्ण व सुदाम यांसारखे सख्य होते. नारायणगिरीजी बाबांच्या कृपेने मुठे वस्तीवर जनार्दन बाबांनी विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर बांधले व त्या विठू मंदिरामध्ये पूजा अर्चना करण्यासाठी स्वामी अरुणनाथगिरी महाराजांची सद्गुरु नारायणगिरी महाराजांकडे मागणी केली. तेव्हा 2001 साली विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर स्वामी अरुणनाथगिरी महाराज भामाठाण भामानगर या ठिकाणी विठू मंदिरात पूजाअर्चा करण्यासाठी आले. विठू मंदिरातील पुजा झाल्यानंतर स्वामी महाराज फावल्या वेळा मध्ये प्रभू रामचंद्र व लक्ष्मण यांच्या अश्रूंनी तयार झालेली शिळा व त्याशिळेवर अडबंगनाथांनी बारा वर्षे तपश्चर्या केलेली आहे अशा पवित्र शिळे जवळ 2001 ते 2003 या कालावधीमध्ये तप साधना केली. त्याच तप साधनेतून स्वामी महाराजांना अडबंगनाथांची दिव्य अनुभूती प्राप्त झाली. ही वार्ता सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांना न सांगता कळाली. स्वतः बाबा विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर 2003 साली अडबंगनाथांच्या तपोभूमीमध्ये आले. या ठिकाणी आल्यानंतर सद्गुरु नारायणगिरी महाराजांनी शिळेविषयी व अडबंगनाथांच्या तपोभूमी विषयी संपूर्ण कथा सांगितली हिचा उदयकाळ आपल्याच हाताने होणार होता हे स्वतः सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांनी सांगितली व स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांना अडबंगनाथांच्या तपोभूमीचे मठाधिपती केले. 2005 साली विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सद्गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते या तपोभूमी मंदिराचे भूमिपूजन झाले. या विजयादशमीच्या शुभ मुहूर्ताला आज 25 वर्ष पूर्ण झालेले आहे.2005 ते 2014 या कालावधीमध्ये अडबंगनाथांचे 35 बाय 125 फुटाचे भव्य दिव्य सभा मंडप मंदिराचे संपूर्ण बांधकाम झाले. अडबंगनाथांच्या तपोभूमी मंदिराचे बांधकाम नऊ वर्ष चालले परंतु मंदिर बांधकाम चालू असताना पाण्याची कमतरता भासली तेव्हा अडबंगनाथांच्या दिव्य अनुभूतीतून मंदिरामध्ये स्वयंभू विहीर बारव त्या ठिकाणी प्रकट झालेली आहे. या विहीर बारव मधील तीर्थाने अनेक रोग नष्ट होतात.अशा भव्य दिव्य तपोभूमी मंदिरात संत महंतांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठा पार पडली. खरंतर या ठिकाणी पूर्वी काहीही नव्हते.संपूर्ण काट्याकुट्या व जंगलच या ठिकाणी होते. परंतु सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने व आदेशाने स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांच्या अथक प्रयत्नातून व परिश्रमातून स्वामी अरुणनाथगिरी महाराजांनी या ठिकाणी शून्यातून विश्व निर्माण केलेले आहे.
स्वयंभू शिळा निर्मिती व अडबंगनाथ तपसाधना
अडबंगनाथांची तपोभूमी सामान्य नसून या ठिकाणी प्रभू रामचंद्र व लक्ष्मण यांच्या अश्रूंनी तयार झालेली स्वयंभूशिळा आहे व याच शिळेवर अडबंगनाथांनी बारा वर्षे तपश्चर्या केलेली आहे,अशी हि भव्य दिव्य अशी तपोभूमी आहे.या ठिकाणचा संपूर्ण उल्लेख नवनाथ ग्रंथांमध्ये 33 व 34 अध्यायात येतो,तसेच भावार्थ रामायणामध्ये ही या ठिकाणचा संपूर्ण उल्लेख आहे. ही उपेक्षित पडलेली जागा सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांनी जगासमोर आणली व सद्गुरु नारायणगिरीजी महाराजांनीच या ठिकाणांचा संपूर्ण इतिहास बाबांच्या अमृततुल्यवाणीतून सर्वांना सांगितला. व अडबंगनाथांच्या तपोभूमी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे पवित्र पावन कार्य स्वामी अरुणनाथगिरी महाराजांना सांगितले. स्वामी महाराजांच्या अतोनात प्रयत्नातून व कष्टातून महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण केले. ओम चैतन्य अडबंगनाथ तपोभूमी मंदिर भामानगर या भूमीचा अलौकिक संपूर्ण महाराष्ट्र देशभर पसरवल आहे.
तपोभूमी मंदिर उत्सव,अन्नक्षेत्र –अन्नदान महत्व व गुरुकुल
अडबंगनाथांच्या या तपोभूमीमध्ये माघ शुद्ध द्वितीया म्हणजेच धर्मनाथ बीज उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो*
.नऊ दिवस ज्ञानयज्ञ,नाम यज्ञ, नाथ यज्ञ, नवनाथ पारायण व दिवसभर अन्नदान ,नऊ दिवस या ठिकाणी सुरू असते.असा भव्य दिव्य उत्सव या तपोभूमीमध्ये पार पडतो. तसेच गुरुपौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा व संपूर्ण मासिक पौर्णिमा या ठिकाणी साजरा होतात. गुरुवार पौर्णिमा एकादशी व ३६५ दिवस या ठिकाणी अन्नदान भंडारा सुरू आहे. या ठिकाणी अन्नदानाला विशेष महत्त्व आहे कारण की माणिक शेतकऱ्याने गोरक्षनाथांना अन्नदान केले तेव्हा माणिक शेतकऱ्याचे अडबंगनाथ झाले. त्यामुळे संस्थानमध्ये भव्य दिव्य अन्नक्षेत्र सुरू आहे. आपणासही अन्नदान करण्याची इच्छा असेल तर संस्थानशी संपर्क साधावा. या ठिकाणी गुरुकुल ही सुरू आहे स्वामी अरुणनाथगिरी महाराज अनाथ सनाथ विद्यार्थ्यांना वारकरी व नाथपंथीय शिक्षण देतात. गुरुकुलामध्ये अनाथ सनाथ अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गुरुकुलामध्ये वारकरी व नाथपंथी शिक्षणाची उत्तम सोय आहे,आपणासही इच्छा असेल तर संस्थांशी संपर्क साधावा तसेच अनाथ सनाथ विद्यार्थ्यांसाठी वस्त्रदान अन्नदान इत्यादी करण्याची इच्छा असेल तर आपण नक्कीच करू शकता… अशाप्रकारे गुरुकुल ही सुरू आहे. अडबंगनाथ संस्थान ग्रंथ रचना
अडबंगनाथांच्या तपोभूमीमध्ये स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांनी अनेक ग्रंथ ही निर्माण केलेले आहेत. अडबंगनाथ गाथा,अडबंगनाथ मनका, संक्षिप्त नवनाथ गाथा, नवनाथ मनका, भजनी मालिका, बालसंस्कार या प्रकारचे आणखीन ही ग्रंथ निर्माण केलेले आहेत. या ग्रंथाचे लेखक श्री निळकंठराव तरकासे बाबूजी आहेत. स्वामी अरुणनाथगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली बाबूजींनी अनेक ग्रंथाची ग्रंथरचना केलेली आहे.
अडबंगनाथ संस्थानमध्ये भाविकांसाठी उपलब्ध सोईसुविधा
अडबंगनाथांच्या तपोभूमीमध्ये वर्षभर उत्सव अन्नदान सत्संग होतात. उत्सवासाठी संस्थांमध्ये 100 बाय 160 फुटाचे भव्य दिव्य असे प्रवचन हॉल आहे. पंचक्रोशीत असे कुठेही भव्य दिव्य प्रवचन हॉल नाहीये. धार्मिक उत्सव,लग्न, सत्संग, वाढदिवस या हॉलमध्ये आनंदात साजरा करण्यासाठी हॉल उपलब्ध आहे. संस्थानमध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांना राहण्याची उत्तम सोय आहे. राहण्यासाठी भक्तनिवास आहे. शॉपिंग सेंटर व भक्तनिवासही आहे. भव्य दिव्य असे गुरु भवन आहे. दर्शनासाठी मुक्कामी येणाऱ्या भाविकांसाठी राहण्याची उत्तम सोयी संस्थान मध्ये आहे. मंदिर परिसरात अनेक वृक्ष आहेत. मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लोक बसविण्यात आलेले आहे. भाविकांना पिण्यासाठी फिल्टर पाण्याचीही सुविधा हि उपलब्ध आहे. भाविकांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा या ठिकाणी करण्यात आलेले आहे.
अडबंगनाथ संस्थान हे तीर्थक्षेत्र क वर्गातून, राज्यस्तरीय ब वर्गात गेलेले आहे, तिर्थक्षेत्र पर्यटन मध्ये आहे. संस्थानास एटीजी ट्वेल ए (ATG 12 A), नीती आयोगही प्राप्त आहे.आपण गुरुकुल, अन्नदान, धार्मिक उत्सव,होतात
मी भाऊसाहेब फड साहेब हे माझे शब्दांकन मी आपल्या चरणाशी अर्पण करत आहे ……
0
0
5
1
8
5




