प.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोलीच्या तपपूर्ती सोहळ्या निमित्ताने शिवमहापुराण कथा व सांगता भंडारा प.पु.गगनगिरी महाराज योगाश्रम खोपोली येथे विविध साधुसंतच्या उपस्थित संपन्न केल्या बद्दल मा श्री रविंद्र खिलारी यांचा प.पु.आशिषगिरी महाराज यांच्या हस्ते सन्मान…..
प.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोलीच्या तपपूर्ती सोहळ्या निमित्ताने शिवमहापुराण कथा व सांगता भंडारा प.पु.गगनगिरी महाराज योगाश्रम खोपोली येथे विविध साधुसंतच्या उपस्थित संपन्न केल्या बद्दल मा श्री रविंद्र खिलारी यांचा प.पु.आशिषगिरी महाराज यांच्या हस्ते सन्मान.....

प.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोलीच्या तपपूर्ती सोहळ्या निमित्ताने शिवमहापुराण कथा व सांगता भंडारा प.पु.गगनगिरी महाराज योगाश्रम खोपोली येथे विविध साधुसंतच्या उपस्थित संपन्न केल्या बद्दल मा श्री रविंद्र खिलारी यांचा प.पु.आशिषगिरी महाराज यांच्या हस्ते सन्मान…..
महाशक्ती न्युज:-अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र कनोली येथील प.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम तपपूर्ती सोहळा व शिव महापुराण प.पु.महामंडेश्र्वर महंत शिवगिरी महाराज व प.पु.महामंडेश्र्वर शांतीगिरी महाराज व विविध साधुसंताच्या उपस्थित भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झाला.
प.पु.दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोलीच्या तपपूर्ती सोहळ्या निमित्ताने शिवमहापुराण कथेचा सांगता भंडारा प.पु.गगनगिरी महाराज
प.पू. श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली तपपूर्ती सोहळया निमित्त आयोजित शिवमहापूराण कथेचा सांगता भंडारा शनिवार दि.२८/१२/२०२४ रोजी खोपोली आश्रमात मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. त्यामध्ये दिवसभरात खोपोली आश्रमातील देवी-देवतांची नानाविध प्रकारची पुजा करण्यात आली. त्यात सोमजाई देवी मंदिरातील देवतांना मंगल स्नान, निळोबा मंदिरातील महादेवाला महाअभिषेक करण्यात आला. गुहेतील देवतांची पुजा आरती करण्यात आली. नवग्रह देवतांचा मान-सन्मान, पाताळगंगा पुजा, यज्ञ मंडपात पुजा व होम हवन करण्यात आले. यावेळी समाधी मंदिरात समाधी व पाळण्याला विविध फुलांची आरस करून आश्रम सजवण्यात आला होता. तसेच सर्व पूजा आवरल्यानंतर महाप्रसाद भंडारा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
या शिवमहापूराण कथेच्या सांगता भंडाऱ्याला कनोली पंचक्रोशी आणि संगमनेर तालुक्यातील अनेक सेवकांनी हजेरी लावली. हा कथा सांगता भंडारा खोपोली आश्रमातील प.पू .अषिश महाराज व प.पू.गणेशगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रमात पार पडला. याप्रसंगी पूजनीय आशिष महाराजांच्या भगिनी अंजलीताई, सौ. मीनाक्षीताई व शिवाजीराजे पाटणकर सरकार, सौ. लताताई व संजय माने सरकार आदी मान्यवर तसेच खोपोली आश्रमातील सर्वच सेवक वृंद आवर्जून उपस्थित होते.
या सांगता भंडाऱ्यासाठी संगमनेर येथील
ह.भ.प. संजयगिरी महाराज देशमुख, कोल्हापूर येथील गुरु बंधू
श्री नंदकुमार पोवार साहेब, लोणावळा येथील ठोंबरे वाडी आश्रमातील डमरुवाले बाबा, अहिल्यानगर येथील
श्री अविनाश साठे, पुणे येथील
श्री नानासाहेब सुर्यवंशी, चाळीसगाव येथील गुरु बंधु
श्री आप्पा काका, लोणी येथील प. पू. स्वामी गगनगिरी महाराजांचे सर्वच भक्त मंडळ उपस्थित होते.
व यानंतर प.पु.आशिषगिरी महाराज यांच्या शुभहस्ते मा.श्री.रविंद खिल्लारी यांनी तपपूर्ती सोहळा व शिवमहापुराण कथा व खोपोली येथील भंडारा हे सर्व कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व सत्कार करून स्वागत करण्यात आले
सर्व प.पु.गगनगिरी महाराज भक्त परिवारचे आभार मांडले तसेच प. पू. श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम कनोली येथील सर्व भक्त मंडळ आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे महिला भक्त मंडळ त्याचप्रमाणे कनोली आणि पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.