ब्रेकिंग
प.पु.गगनगिरी महाराज सेवा आश्रम तपपूर्ती सोहळ्या निमित्ताने श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांचे श्री तिर्थक्षेत्र कनोली येथे शिवमहापुराण कथेची सातव्या दिवशी सांगता……
प.पु.गगनगिरी महाराज सेवा आश्रम तपपूर्ती सोहळ्या निमित्ताने श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांचे श्री तिर्थक्षेत्र कनोली येथे शिवमहापुराण कथेची सातव्या दिवशी सांगता......

0
0
2
6
1
6
प.पु गगनगिरी महाराज सेवा आश्रम तपपूर्ती सोहळ्या निमित्ताने श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांचे श्री तिर्थक्षेत्र कनोली येथे शिवमहापुराण कथेची सातव्या दिवशी सांगता……
अहिल्यानगर (महाशक्ती न्युज) अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र कनोली येथील प.पु.श्री दत्त गगनगिरी महाराज सेवा आश्रम तपपूर्ती सोहळया निमित्ताने श्री.श्री. १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांचे शुक्रवार ०८/११/२०२४ ते गुरुवार १४/११/२०२४ या कालावधीत संध्याकाळी ६ते ९ या वेळेत शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली होती.
सकाळी ६ वाजता अभिषेक व विधीवत पुजा आरती व १० वाजता होम हवन पुजा व १२ वाजता आरती व मेडिकव्हर हांस्पिटल व अर्पण ब्लड बँक संगमनेर तसेच गगनगिरी महाराज भक्त परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने दररोज संध्याकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत मोफत सर्व रोग निदान शिबिर व तसेच रक्तदान शिबीर आयोजित केले होते.
दररोज संध्याकाळी ७ वाजता शिव महापुराण कथेस सुरुवात झाली व उपस्थित सर्व साधु संताचे पुजन व सत्कार करण्यात आला व स्वामी गगनगिरी महाराज व स्वामी जनार्दन यांच्या जीवन कार्यावरती महिती देण्यात आली व १२ ज्योतिर्लिंग विषयी सविस्तर माहिती देण्यात आली व महादेव पार्वती शुभ विवाह, तुळशी विवाह व घरातील दोष व त्यावरती उपाय व महादेव पुजेविषयी सविस्तर माहिती दिली व त्यानंतर ९ :३० वाजता साधु संतांच्या उपस्थित व भाविक भक्तांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली यावेळी श्री राधाकृष्ण विखे पाटील, सौ. शालिनीताई विखे पाटील,सौ.जयश्री थोरात,श्री राजेंन्द्र पिपाडा सौ.प्रभावती गोगरे यांच्या सह अनेक राजकीय सामाजिक श्रेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेटी दिल्या.
यावेळी १००८ श्री श्री महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज व खोपोली येथील महाराज व यावेळी महाराष्ट्रातील विविध आश्रमाचे साधु संत, महंत हे ही उपस्थित होते.व सर्वांचे संत पुजन करण्यात आले व आदर सत्कार करण्यात आला व नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते
या कार्यक्रमाचा लाभ प.पु.स्वामी गगनगिरी महाराज सर्वच भक्त परिवार व महिला कनोली व पंचक्रोशीतील सर्वच भाविक भक्तांनी लाभ घेतला आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प.पु.गगनगिरी महाराज सर्वच भक्त परिवार व मित्र परिवार व महिला,युवक व सर्वच ग्रामस्थ कनोली व संगमनेर तालुक्यातील प.पु.गगनगिरी महाराज सर्वच भक्त परिवाराने तनमन धनाने विशेष परिश्रम घेतले आहे.
0
0
2
6
1
6