ब्रेकिंग
श्रीश्रेत्र मांलुजे,शेडगाव,ओझर,चिंचाळे व पंचक्रोशी ते श्रीश्रेत्र त्र्यंबकेश्वर श्री निवृत्तीनाथ पायी दिंडी सोहळा विविध कार्यक्रमासह श्री त्र्यंबकेश्वर येथे संपन्न……
श्रीश्रेत्र मांलुजे,शेडगाव,ओझर,चिंचाळे व पंचक्रोशी ते श्रीश्रेत्र त्र्यंबकेश्वर श्री निवृत्तीनाथ पायी दिंडी सोहळा विविध कार्यक्रमासह श्री त्र्यंबकेश्वर येथे संपन्न......

0
0
2
6
1
6
श्रीश्रेत्र मांलुजे,शेडगाव,ओझर,चिंचाळे व पंचक्रोशी ते श्रीश्रेत्र त्र्यंबकेश्वर श्री निवृत्तीनाथ पायी दिंडी सोहळा विविध कार्यक्रमासह श्री त्र्यंबकेश्वर येथे संपन्न……
महाशक्ती न्युज:- श्री श्रेत्र मांलुजे,शेडगाव,
ओझर,चिंचाळे व पंचक्रोशी ते श्रीश्रेत्र त्र्यंबकेश्वर श्री निवृत्तीनाथ पायी दिंडी सोहळा शनिवार १८/०१/२०२५ ते रविवार २६/०१/२०२५ या कालखंडामध्ये दिंडी सोहळा संपन्न झाला.
श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज,श्री विठ्ठल रुक्मिणी,श्री हनुमान,श्री महादेव,श्री निवृत्तीनाथ महाराज,श्रीसंत भगवान बाबा,श्री संत श्रीपादबाबा श्री संत रामदास बाबा यांच्या कृपाशीर्वादाने व हभप विलास महाराज मदने श्री पांडुरंग महाराज घुगे हभप देवराम महाराज घुगे हभप हभप गुणाभाऊ आंधळे हभप अनिल महाराज आव्हाड हभप बाळासाहेब वाणी हभप बाबासाहेब माळी यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व समस्त ग्रामस्थ यांच्या साथीने श्रीश्रेत्र मांलुजे शेडगाव ओझर चिंचाळे व पंचक्रोशी ते श्रीश्रेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
दररोज सकाळी पहाटे ५ते७ काकडा आरती सकाळी ८वाजता चहा व नाष्टा व दुपारचे जेवण व दुपारचा चहा व नाष्टा संध्याकाळी ५ ते ७ वाजता हरीपाठ ७ ते ९ विविध किर्तनकाराची प्रवचन व किर्तन सेवा संपन्न झाली व त्यानंतर महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री व सौ.नागरे साहेब नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन दिनांक २५/०१/२०२५ शनिवारी संध्याकाळी झाले
रविवार दिनांक २६/०१/२०२५ सकाळी ८ते १० हभप विलास महाराज मदने यांचे काल्याचे किर्तन झाले व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.आंनद आखाडा स्वामी समर्थ महाराज मंदीर गेट नं.२च्या समोर रिंग रोड त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे हे सर्व कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते अनेक भाविक भक्तांनी तन मन धनाने विविध प्रकारे मदत केली या सोहळ्यासाठी
सर्वच वारकरी टाळकरी भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन हा पालखी सोहळा यशस्वी केला आहे
0
0
2
6
1
6