ब्रेकिंग
श्री सदगुरू बाळुमामा पालखी व मेंढी माऊलीचे आदिशक्ती जगदंबा माता मंदिराजवळ श्रीतिर्थश्रेत्र ओझर बु येथे शनिवारी आगमन……
श्री सदगुरू बाळुमामा पालखी व मेंढी माऊलीचे आदिशक्ती जगदंबा माता मंदिराजवळ श्रीतिर्थश्रेत्र ओझर बु येथे शनिवारी आगमन......

0
0
2
6
1
6
श्री सदगुरू बाळुमामा पालखी व मेंढी माऊलीचे आदिशक्ती जगदंबा माता मंदिराजवळ श्रीतिर्थश्रेत्र ओझर बु येथे शनिवारी आगमन……
महाशक्ती न्युज:- अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र ओझर बु आदिशक्ती जगदंबा माता मंदिराजवळ दिनांक १८/०१/२०२५ शनिवारी दुपारी २ वाजता भव्य दिव्य स्वरूपात मिरवणुकीसह वाजत गाजत ओझर बु येथे येणार आहे त्या अगोदर आश्र्वी बु येथुन सकाळी ११ वाजता विधीवत पूजा आरती करून आश्र्वी बु, उंबरीबाळापुर,ओझर खु या मार्गे ओझर बु येथे आदिशक्ती जगदंबा माता मंदिराजवळ येणार आहे.
दिनांक १८/०१/२०२५ शनिवारी संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत श्री सद्गुरू बाळुमामाची कथा हा कार्यक्रम होईल व त्यानंतर ९ वाजता महाआरती होईल व त्यानंतर आमटी भाकरीचा महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे
व रविवार दिनांक १९/०१/२०२५ सकाळी ९:३० वाजता महाआरती होईल व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे व संध्याकाळी ७ ते ९ हभप ढवळे महाराज तळेगाव कर यांचे जाहीर हरी किर्तन होईल व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या सर्व कार्यक्रमाचा व दर्शनाचा व महाआरतीचा व महाप्रसादाचा जास्तीत जास्त भाविक भक्तांनी आवश्यक लाभ घ्यावा असे आवाहन समस्त सर्व ग्रामस्थ व सर्व युवक मित्र परिवार ओझर बु तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांनी केले आहे.
0
0
2
6
1
6