ई-पेपर
श्रीश्रेत्र कनकापुर येथे पंचदिनी हरिनाम सप्ताह निमित्ताने महंत गुरूवर्य स्वामीजी रामगिरी महाराजाचे सकाळी ११ वाजता काल्याचे किर्तन …..
श्रीश्रेत्र कनकापुर येथे पंचदिनी हरिनाम सप्ताह निमित्ताने महंत गुरूवर्य स्वामीजी रामगिरी महाराजाचे सकाळी ११ वाजता काल्याचे किर्तन .....

0
0
5
1
8
3
श्रीश्रेत्र कनकापुर येथे पंचदिनी हरिनाम सप्ताह निमित्ताने महंत गुरूवर्य स्वामीजी रामगिरी महाराजाचे सकाळी ११ वाजता काल्याचे किर्तन …..
महाशक्ती न्युज
(मुख्य संपादक भाऊसाहेब फड साहेब ओझरकर)
बुधवार दिनांक २५/०२/२०२६
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीश्रेत्र कनकापुर येथे पंचदिनी हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बह्म लीन गंगागिरी महाराज ब्रह्म लीन नारायणगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व महंत गुरूवर्य सद् गुरू रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली लेने को हरिनाम|
देने को अन्नदान||
तरने को लिनता|
डुबने को अभिमान||
कनकापुर येथील गणपती मुर्ती, विठ्ठल रुक्मिणी माता, खोकल्याई देवी,महादेव पिंड, दक्षिण मुखी हनुमान व नारायणगिरी महाराज पादुका या सर्वांचा ९ वा वर्धापनदिन सोहळया निमित्ताने पंचदिनी हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण यासह पहाटे ४ते६ काकडा आरती सकाळी ८:३० ते १ वाजेपर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, सायंकाळी ५ते ६ हरिपाठ व ७ते ९ महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकाराची किर्तन सेवा संपन्न झाली.त्यांनतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
आज बुधवार दिनांक २५/०२/२०२६ रोजी सकाळी ९ वाजता कनकापुर संपूर्ण गावातुन भव्यदिव्य स्वरूपात मिरवणुक काढण्यात येईल व त्यानंतर ११ते १ वाजेपर्यंत महंत गुरूवर्य स्वामीजी रामगिरी महाराज यांचे काल्याचे किर्तन सेवा संपन्न होईल व त्यांनतर कनकापुर सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी कनकापुर सर्व ग्रामस्थ व महिला, भाविक भक्त व पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त सर्व ग्रामस्थ कनकापुर सर्व सप्ताह कमेटी यांनी महाशक्ती न्युज चैनलशी बोलताना केले आहे.
0
0
5
1
8
3




