ब्रेकिंग
कार्तिक स्नान समाप्ती निमित्ताने श्री तिर्थक्षेत्र ओझर बु येथे त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह संपन्न …..
कार्तिक स्नान समाप्ती निमित्ताने श्री तिर्थक्षेत्र ओझर बु येथे त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह संपन्न .....

0
0
2
6
1
6
कार्तिक स्नान समाप्ती निमित्ताने श्री तिर्थक्षेत्र ओझर बु येथे त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह संपन्न …..
अहिल्यानगर (महाशक्ती न्युज) अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील श्रीतिर्थश्रेत्र ओझर बु येथे कोजागिरी पौर्णिमा पासून ते कार्तिक स्नान समाप्ती पर्यंत काकडा आरती चे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्ताने १२/११/२०२४ ते १५/११/२०२४ पर्यंत त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यात सकाळी ४ते ६ काकडा आरती भजन व सकाळी ७ते १२ ज्ञानेश्वरी पारायण संध्याकाळी ६ ते ७ हरिपाठ व ७ ते ९ जाहिर हरी किर्तन झाले त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
१२/११/२०२४ मंगळवार सायंकाळी ७ ते ९ हभप नवले महाराज याचे किर्तन झाले, श्री आहिलाजी खेमनर यांच्या वतीने एकादशी निमित्याने खिचडी चा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
१३/११/२०२४ बुधवार सायंकाळी ७ते९ हभप जगन महाराज उंबरकर यांचे जाहिर हरी किर्तन झाले. व अनिल नागरे, मारूती नागरे व अर्जुन हळनर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात होते
१४/११/२०२४ गुरुवार सायंकाळी ७ ते ९ हभप कान्होपात्राताई सुर्यवंशी यांचे जाहिर हरी किर्तन झाले व त्यानंतर श्री वामन खेमनर श्री जितेंद्र सानप श्री संजय नागरे यांच्या वतीने महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
१५/१४/२०२४ शुक्रवार सकाळी ८ते १० भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात आली होती.व त्यानंतर १०:३० ते. १ वा प्रबोधनकार हभप प्रकाश महाराज आव्हाड यांचे काल्याचे जाहिर हरी किर्तन झाले व त्यानंतर समस्त ग्रामस्थ ओझर बु यांच्या वतीने महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते
संपुर्ण सप्ताह काळात श्री विकास सानप व श्री शुभम खेमनर यांईच्या वतीने मोफत पाण्याचे जीआर देण्यात आले होते
ओझर बु येथील समस्त ग्रामस्थ व महिला सर्व बचत गट व भजनी मंडळ,सप्ताह कमेटी व पंचक्रोशीतील भाविक भक्त होते
0
0
2
6
1
6